जोस बटलरने पडकला सुपर कॅच; गोलंदाजालाही बसला नाही विश्वास, पाहा नेमकं काय घडलं... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 25, 2022

जोस बटलरने पडकला सुपर कॅच; गोलंदाजालाही बसला नाही विश्वास, पाहा नेमकं काय घडलं...

https://ift.tt/EUGYchP
कोलकाता : जोस बटलर हा फलंदाज म्हणून कसा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण या सामन्यात सर्वत्रच जोसचा संचार दिसला. कारण जोसने या सामन्यात एक कॅच अशी पकडली की, गोलंदाज ओबेड मकायलाही विश्वास बसला नाही. सामन्यात नेमकं घडलं तरी काय, पाहा...ही गोष्ट घडली ती १०व्या षटकात. हे षटक राजस्थानचा वेगवान गोलंदाज ओबेड मकाय टाकत होता. या षटाकाच्या तिसऱ्या चेंडूवर गुजरातचा धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू वेडने दमदार फटका लगावला. हा फटका एवढा जबरदस्त होता की, तो पाहिल्यावर हा चेंडू थेट सीमारेषेपार जाईल आणि गुजरातला षटकार मिळेल, असे मकायला वाटले होते. पण यावेळी घडले ते वेगळेच. जोस यावेळी फिल्डींग करत असताना त्याच्या जवळ हा चेंडू आला होता. हा चेंडू षटकार किंवा किमान चौकार तरी जाईल, असे काही जणांना वाटत होते. पण त्यावेळी जोसने कशी फिल्डींग करायची याचा उत्तम वस्तुपाठ दाखवून दिला. जोसने यावेळी अजिबात घाई केली नाही. त्याने चेंडूचा अंदाज घेतला आणि हा चेंडू नेमका कुठे हातात येऊ शकतो, हे त्याने चाचपून घेतले. त्यानुसार तो मैदानात उभा राहीला. चेंडू थोडासा मागे जाईल, हे जोसला आधीच कळले होते. त्यामुळे जोस थोडासा मागे झुकला आणि त्याने अप्रतिम झेल टिपल्याचे यावेळी पाहायला मिळाले. जोसने जेव्हा झेल टिपला त्यावेळी गोलंदाज मकायचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. हा चेंडू षटकार गेला असे त्याला वाटत होते. पण त्यानंतर संघातील सहकाऱ्यांनी त्याला हा झेसल जोसने टिपल्याचे सांगितले आणि ते पाहिल्यावर मकायचा या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. त्यानंतर मकायने मैदानात दाखवलेला रिप्ले पाहिला आणि त्यानंतरच त्याला या गोष्टीवर विश्वास बसला. त्यामुळे जोस यावेळी फक्त गोलंदाजीतच नाही तर फिल्डिंगमध्येही अव्वल ठरल्याचे यावेळी सर्वांना पाहायला मिळाले. त्याचबरोबर सामन्याच्या सुरुवातीला एक चौकारही जोसने अडवला होता.