आरसीबीच्या संघात बदली खेळाडू म्हणून आला आणि शतक झळकावत रजत पाटीदार हिरो ठरला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 26, 2022

आरसीबीच्या संघात बदली खेळाडू म्हणून आला आणि शतक झळकावत रजत पाटीदार हिरो ठरला

https://ift.tt/qnF3Pgz
कोलकाता : एलिमिनेटरच्या महत्वाच्या सामन्यात रजत पाटीदारने धडाकेबाज शतक झळकावले आणि सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लिलावात आरसीबीच्या संघाने रजतला आपल्या संघात दाखल करून घेतले नव्हते. त्यामुळे एक बदली खेळाडू म्हणून तो संघात आला आणि त्याने शतकासह आरसीबीला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. रजत पाटीदार आरसीबीच्या संघात कोणाच्या जागी आला, जाणून घ्या....आरसीबीच्या संघाने लिलावात लवनित सिसोदियाला आपल्या संघात स्थान दिले होते. पण सिसोदिया दुखापतग्रस्त झाला. त्याची दुखापत एवढ्या गंभीर स्वरुपाची होती की, तो आयपीएलमधील एकही सामना खेळू शकणार नव्हता. त्यामुळे आरसीबीच्या संघाने सिसोदियाला संघाबाहेर काढले आणि रजत पाटीदारला संघात स्थान दिले. आरसीबीच्या संघाने रजत पाटीदारला फक्त २० लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्याता दाखल केले होते. पण या हंगामात रजतने सातत्याने कामगिरी केल्यामुळे त्याला या महत्वाच्या सामन्यात संधी देण्यात आली. रजतने या संधीचे सोने केल्याचे पाहायला मिळाले. कारण या महत्वाच्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिस पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर विराट कोहली (२५) आणि ग्लेन मॅक्सवेलही (९) मोठी खेळी साकारू शकला नाही. त्यामुळे आरसीबीच्या संघाचे आज काय होणार, याची चिंता त्यांच्या चाहत्यांना वाटत होती. यावेळी रजत आरसीबीच्या संघासाठी धावून आला. रजतने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी केली आणि षटकारासह आपले ट्वेन्टी-२० क्रिकेटमधले पहिले शतक झळकावले.यापूर्वी रजत मध्य प्रदेशकडून खेळत होता. मध्य प्रदेशकडून ३१ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये त्याने ८६१ धावा केल्या होत्या आणि यामध्ये सात अर्धशतकांचा समावेश होता. लखनौच्या गोलंदाजांचा रजतने यावेळी खरपूस समाचार घेतला आणि त्यामुळेच आरसीबीच्या संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठता आला. रजतचे पाटीदारच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर आरसीबीच्या संघाने २०८ धावांचे आव्हान लखनौपुढे ठेवले. पाटीदारने यावेळी ५४ चेडूंत १२ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ११२ धावांची खेळी साकारली.