राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण; पक्षाने केला 'हा' आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण; पक्षाने केला 'हा' आरोप

https://ift.tt/Tgf927h
म. टा. प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कसबा मतदार संघाचे पदाधिकारी अप्पासाहेब जाधव यांना बुधवारी सायंकाळी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यामागे भारतीय जनता पक्षाच्या माथाडी कामगार विभागातील संतोष कांबळे आणि साथीदारांचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. नारायण पेठेतील केळकर रस्त्यावर जाधव यांचे संपर्क कार्यालय आहे. जाधव त्यांच्या कार्यालयात असताना काही तरुण तेथे आले. कांबळे आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जाधव यांना मारहाण करून कांबळे आणि साथीदार तेथून पसार झाले. तेव्हा परिसरात तणाव निर्माण झाला होता. क्लिक करा आणि वाचा- या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने नारायण पेठेत जमले. विश्रामबाग पोलिस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल करून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जगताप यांनी केली. क्लिक करा आणि वाचा- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी समाजमाध्यमावर अवमानकारक मजकूर लिहिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या शुक्रवार पेठेतील कार्यालयात जाऊन धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी अप्पासाहेब जाधव यांच्यासह सहाजणां विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता जाधव यांना मारहाण करण्यात आल्याने राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष चिघळला आहे. क्लिक करा आणि वाचा-