भाट्ये समुद्रकिनारी आढळला विषारी काटेरी केंड मासा; शत्रू जवळ आला की फुटबॉलसारखा बनतो - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 12, 2022

भाट्ये समुद्रकिनारी आढळला विषारी काटेरी केंड मासा; शत्रू जवळ आला की फुटबॉलसारखा बनतो

https://ift.tt/jCFrso6
प्रसाद रानडे, रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना काटेरी केंड (porcupine puffer) हा विषारी असलेला अत्यंत दुर्मिळ मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. काटेरी केंड हा मासा विषारी प्रकारातील मासा आहे. शत्रू जवळ येताच त्याचा आकार फुटबॉल सारखा होतो. याच्या कातडीत टॉक्सिन असते, तरीही ते बाजूला करून याच्या कातडीपासून अल्कोहोलिक पदार्थ बनवले जातात. या पदार्थांना परदेशात खूप मागणी असते. याला काटेवाला केंड मासा म्हणून ओळखले जाते. हा पश्चिम किनारपट्टीला आढळतो त्याच्या सात जाती आहेत. ( a rare poisonous fish was found dead at in ) या माशाविषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुरेश नाईक या वेगळ्या प्रकाराच्या केंड प्रकारातील माशाची माहिती 'महाराष्ट्र टाईम्स ऑनलाइन'शी बोलताना दिली. क्लिक करा आणि वाचा- केंड माशाच्या झुंडीमध्ये बिनकाटेवाला केंड याचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. या काटेवाला प्रकारातील माशाच्या अंगावर काटे जास्त असतात. ज्यावेळी हा मासा सर्वसाधारण माशाच्या आकाराचा असतो त्यावेळी त्याच्या अंगावर काटे दिसत नाहीत. पण ज्यावेळी एखादा शत्रू प्राणी किंवा मनुष्य त्याच्या जवळ येतो तेव्हा त्याच्या पोटात असलेल्या हवेच्या पिशवीच्या माध्यमातून हवा पोटात घेतो आणी आपला आकार हा जणू फुटबॉल सारखा करतो. त्यावेळेस काटे टोकदार होतात. हे त्याचे वैशिष्ट्य मानले जाते. हा मासा कमी प्रमाणात आढळत असला तरी देखील हा अतिशय उपद्रवी आहे. मनुष्यासाठी हा मासा उपयोगी नाही. क्लिक करा आणि वाचा- काटेवाला केंड या माशाच्या कातडीत मोठ्या प्रमाणावर विषाचे प्रमाण असते. जपानसारख्या देशात हे केंड मासे खाल्ले जातात. पण त्यावेळी या माशावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केली जाते. अवयव काढून कातडीमध्ये असलेले विषारी असलेला टॉक्सिन हा पदार्थ काढून घेतला जातो. त्यानंतरच यापासून पदार्थ तयार केले जातात. पण या पदार्थांपासून मनुष्याला नशा येते. कारण यामध्ये काही विषाचा अंश शिल्लक राहिलेला असतो. यामुळे या पदार्थांना जपानसारख्या देशात खूप मोठी मागणी आहे. क्लिक करा आणि वाचा- प्राचीन काळी हा मासा सुकवला जात असे. तो सुकला की त्याच्या आतील घटक काढून त्याचा डोक्यावरील शिरस्त्राण म्हणून वापर केला जात असे, अशी कुतुहल निर्माण करणारी माहितीही मत्स्य संशोधक डॉ. नाईक यांनी दिली.