विजयानंतरही आयपीएलबाहेर जाऊ शकते आरसीबी, पाहा प्ले ऑफचे समीकरण आहे तरी काय... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 20, 2022

विजयानंतरही आयपीएलबाहेर जाऊ शकते आरसीबी, पाहा प्ले ऑफचे समीकरण आहे तरी काय...

https://ift.tt/oSqBm1p
मुंबई : आरसीबीच्या संघाने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सवर विजय साकारला. या विजयासह आरसीबीचे आता १६ गुण झाले आहेत, त्याचबरोबर त्यांनी गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. पण तरीही या विजय़ानंतर आरसीबीचा संघ हा आयपीएलमधून आऊट होऊ शकतो, असे दिसत आहे. जाणून घ्या काय आहे प्ले ऑफचे समीकरण....आरसीबीच्या संघाने आजच्या सामन्यात विजयासह १६ गुण पटकावले. आतापर्यंत प्ले ऑफमध्ये गुजरात आणि लखनौचे संघ पोहोचले आहेत. त्याचबरोबर आरसीबीचे आता १६ गुण असून राजस्थानचेही तेवढेच गुण आहेत. पण आता राजस्थान रॉयल्सचा एक सामना बाकी आहे. हा सामना त्यांनी जिकला तर त्यांचे १८ गुण होऊ शकतात आणि गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर जाऊ शकतात. त्याचबरोबर प्ले ऑफमधील स्थान ते १८ गुणां,सह निश्चित करू शकतात. त्याचबरोबर गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे आता १४ गुण आहेत आणि त्यांचा एक सामना बाकी आहे. हा सामना जर त्यांनी जिंकला तर त्यांचे आरसीबी एवढेच म्हणजे १६ गुण होणार आहेत आणि तिथेच आरसीबीचा संघ मार खाऊ शकतो. कारण आरसीबीने गुजरातवर विजय साकारला असला तरी त्यांचा रन रेट हा जास्त वाढलेला नाही, त्यांचा रनरेट हा -0.253 आहे. दुसरीकडे राजस्थचा रनरेट हा 0.304 असून दिल्लीचा रनरेट 0.255 एवढा आहे. त्यामुळे राजस्थानने अखेरचा सामना गमावला तरी ते १६ गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. दुसरीकडे फक्त दिल्लीने विजय साकारला तर ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. त्यामुळे या विजयानंतर मात्र आरसीबीच्या संघाने प्ले ऑफमध्ये जाणे अजूनही निश्चित नाही. कारण त्यांना आता राजस्थान आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यांमध्ये नेमकं काय घडतं हे पाहावे लागणार आहे. सध्याच्या घडीला आरसीबी विजयासह तिसऱ्या स्थानावर आहेत. पण राजस्थान आणि दिल्लीच्या सामन्यानंतर ते अव्वल चार संघांमध्ये काॉयम राहतात का, हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे आता राजस्थान आणि दिल्लीच्या सामन्यांमध्ये नेमकं काय होतं, याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतील.