...तर जोस बटलरचे शतक होऊच शकले नसते, आरसीबीविरुद्धच्या सामन्यात घडली होती मोठी चूक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 28, 2022

...तर जोस बटलरचे शतक होऊच शकले नसते, आरसीबीविरुद्धच्या सामन्यात घडली होती मोठी चूक

https://ift.tt/jCBw4rh
अहमदाबाद : राजस्थान रॉयल्सच्या विजयापेक्षा सर्वात जास्त चर्चा सुरु झाली आहे ती जोस बटलरची. कारण बटलरने या सामन्यात धडाकेबाज शतक झळकावले आणि संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. पण या सामन्यात बटलरचे शतक होऊ शकले नसते. कारण आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून एक मोठी चुक घडली होती. बटलरकडून नेमकी कोणती चूक घडली होती, पाहा...बटलरने या सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण त्यानंतर शतकापर्यंत पोहोचताना मात्र त्याच्याकडून एक मोठी चूक घडली होती. एक मोठा फटका मारण्याच्या नादात बटलर बाद होऊ शकला असता. बटलरला यावेळी ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दिनेश कार्तिकने जीवदान दिले आणि तेच आरसीबीला चांगलेच महागात पडले. कारण त्यावेळी बटलर हा ६६ धावांवर होता. या जीवदानाचा बटलरने चांगला फायदा उचलला आणि शतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राजस्थानने कसा साकारला आरसीबीवर विजय, पाहा...आरसीबी आणि राजस्थान यांच्यातील क्वालिफायर -२ चा सामना चांगलाच रंगला. सामन्याच्या सुरुवातीला आरसीबी हा सामना जिंकेल, असे वाटत होते. पण त्यानंतर जेव्हा अर्धशतकवीर रजत पाटीदार बाद झाला तेव्हा आरसीबीच्या हातातून सामना निसटायला सुरुवात झाली. आरसीबीचा संघ रजत पाटीदारच्या अर्धशतकाच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारेल असेल वाटत होते. कारण पाटीदारने ५८ धावांची खेळी साकारत आरसीबीला चांगली धावसंख्या उभारून दिली होती. पण आरसीबीच्या संघाने अखेरच्या षटकांमध्ये एकापाठोपाठ विकेट्स गमावल्या आणि त्यामुळेच त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. पाटीदारच्या ५८ धावांच्या जोरावर आरसीबीने राजस्थानपुढे विजयासाठी १५८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलरने दमदार फटकेबाजी केली आणि राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन यांनीही चांगली फटकेबाजी केली पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पण बटलरने ही कसर भरून काढली.