Sidhu Moosewala- लॉरेन्स टोळीने केली सिद्धू मूसेवालाची हत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 30, 2022

Sidhu Moosewala- लॉरेन्स टोळीने केली सिद्धू मूसेवालाची हत्या

https://ift.tt/VpMGI7H
चंदिगढ- प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसवाला यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. कॅनडाच्या लॉरेन्स गँग ने गायकाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या प्रकरणी डीजीपी म्हणाले की, गायकावर तीन प्रकारच्या शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला. यात यांच्यासोबत त्यांच्या साथीदाराचाही मृत्यू झाला. मानसा जिल्ह्याच्या जवाहरके गावात सिद्धू मूसेवाला यांच्या वाहनावर ३० राउंड गोळीबार करण्यात आला. या घटनेत सिद्धू मुसेवाला यांच्यानंतर त्यांच्या साथीदाराचाही मृत्यू झाला आहे, तर दुसरा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. आता मानसातील वातावरण तणावपूर्ण आहे. अनेक चाहते इस्पितळाबाहेर निदर्शनं करत आहेत आणि सुरक्षा कमी केल्याबद्दल आम आदमी सरकारचे अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विरोधात घोषणा देत आहेत. सिद्धू मुसेवाला यांची लॉरेन्स टोळीने केली हत्या डीजीपी व्हीके भवरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, आयजीच्या नेतृत्वाखाली मूसेवाला खून प्रकरणाचा तपास करेल. सध्या आयजी आणि एसपी मानसात तळ ठोकून आहेत. मूसेवालावरील हल्लेखोर बुलेटप्रूफ वाहनात नव्हते आणि लॉरेन्स गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली. सिद्धू मुसेवाला यांना संरक्षणासाठी पंजाब पोलिसांचे एकूण चार कमांडो मिळाले होते. सुरक्षा कमी केल्यानंतर दोन कमांडो मागे घेण्यात आले. दोन कमांडो अजूनही त्यांच्यासोबत होते. काय आहे संपूर्ण प्रकरण मानसा गावात दोन हल्लेखोरांनी सिद्धू मूसेवाला यांच्या वाहनावर एके- ९४ मधून ३० राऊंड गोळीबार केला. कारमध्ये सिद्धूसोबत त्यांचे दोन साथीदारही होते. या अपघातात एका साथीदाराचा मृत्यू झाला आहे, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या संपूर्ण घटनेच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने सिद्धू मूसेवाला यांची सुरक्षा कमी केली होती. याबाबत चाहत्यांनी राज्य सरकारला घेराव घातला असून या संपूर्ण प्रकरणावरून राजकारण तापले आहे. मानसात तणावाचे वातावरण सध्या मानसातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. मूसेवाला यांना मृत घोषित करण्यात आलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमधील आम आदमी पार्टीचे सर्व पोस्टर्स लोकांनी फाडून टाकले आहेत. दुसरीकडे मूसेवाला हत्याकांड प्रकरणी एसआयटी तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.