'महाराष्ट्र तुमच्यासोबत'; ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पहिला बॅनर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 26, 2022

'महाराष्ट्र तुमच्यासोबत'; ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पहिला बॅनर

https://ift.tt/O3etFhi
ठाणे : सध्या राज्यासह ठाण्यात राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. ठाण्यात सगळीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना बॅनरबाजी करून मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवत असताना एक बॅनर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समर्थनार्थ देखील लावलेला पाहायला मिळाला आहे. ठाण्यात लावण्यात आलेला उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात हा पहिला बॅनर पाहायला मिळाला आहे. (the first has been put up in ) एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरुद्ध बंड पुकारल्यानंतर ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजीला केलेली पाहायला मिळाली. या बॅनरबाजीच्या माध्यमातून शिंदे समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन केले जात असताना ठाण्यातील सावरकरनगर परिसरातील इंदिरा गांधी शाळेजवळ एका शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावला आहे. ठाण्यातील सावरकरनगर परिसरात लावण्यात आलेला हा बॅनर उद्धव ठाकरे यांना समर्थन करणारा पहिला बॅनर आहे. या बॅनरवर 'महाराष्ट्र तुमच्यासोबत' असा संदेश देण्यात आलेला आहे. क्लिक करा आणि वाचा- 'काळ संकटाचा आहे पण, काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे' तसेच या बॅनरवर 'आम्ही शिवसेनेसोबत कायम साहेबांसोबत' 'काळ संकटाचा आहे पण, काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे' असे दोन मजकूर त्यात लिहलेले आहे. क्लिक करा आणि वाचा- हा लावण्यात आलेल्या बॅनर एका उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकाने लावला आहे. या बॅनरवर कुठल्याही उद्धव ठाकरे समर्थकाचे नाव किंवा फोटो नाही. या बॅनर वर फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, शिवसेना पक्षप्रमुख तथा आणि मंत्री तथा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे फोटो आणि काही मजकूर लिहलेले आहेत. संपूर्ण ठाण्यात शिंदे समर्थकांकडून एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलेले बॅनर झळकत असताना हा एकमेव बॅनर हा उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेला आहे. क्लिक करा आणि वाचा-