शंभुराज, आवाडे, आबिटकर, बाबर मंत्रिपदाच्या शर्यतीत; दक्षिण महाराष्ट्रात मंत्रिपदासाठी होणार चुरस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 24, 2022

शंभुराज, आवाडे, आबिटकर, बाबर मंत्रिपदाच्या शर्यतीत; दक्षिण महाराष्ट्रात मंत्रिपदासाठी होणार चुरस

https://ift.tt/h9svHoc
गुरुबाळ माळी, कोल्हापूर राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता येणार हे आता जवळजवळ निश्चित झाले असून या सरकारमध्ये दक्षिण महाराष्ट्रातील अनेक जण मंत्रिपदासाठी आपला हक्क सांगताहेत. हक्कदार अनेक आणि मंत्रिपदे कमी अशी अवस्था पुन्हा होण्याची शक्यता आहे. सध्यातरी या भागातील , , शंभूराज देसाई, , जयकुमार गोरे, प्रकाश आबिटकर, , आणि शहाजीबापू पाटील अशी अनेक नावे चर्चेत आहेत. (shambhuraj desai awade abitkar babar yadravkar are in the race for the ministry post) दक्षिण महाराष्ट्रात शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले सर्वच आमदार आता शिंदे गटात गेले आहेत, यामुळे या सर्वांनाच आता मंत्रिपदाचे बक्षीस मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. पण ते शक्य नाही. कारण भाजपला जनसुराज्य सारख्या मित्र पक्षांनाही आता मंत्रीपद द्यावे लागणार आहे. मुळात शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदासह नऊ ते दहा मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. या पदाच्या शर्यतीत सेनेचे अनेक दिग्गज नेते आहेत. त्यामुळे चाळीस पैकी नऊ ते दहा आमदारांनीच मंत्रीपद मिळणार आहे. यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील दोन किंवा 3 आमदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. क्लिक करा आणि वाचा- हे सध्या मंत्री आहेत. शिंदे गटात जाणारे ते पहिले मंत्री असल्याने त्यांचा मंत्रिपदासाठी नक्की विचार केला जाऊ शकतो. याशिवाय सातारा जिल्ह्यातून महेश शिंदे हेसुद्धा आपला हक्क सांगू शकतात. सांगली जिल्ह्यात अनिल बाबर हे शिवसेनेचे एकमेव आमदार होते. ते शिंदे गटासोबत गेल्याने यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जातो. चार वेळा निवडून येऊनही त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराजीतून ते शिंदे गटात पहिल्या गाडीने गेले होते. याशिवाय सांगली जिल्ह्यात भाजपच्या वतीने सुरेश खाडे यांचे नाव अग्रभागी असण्याची असेल. क्लिक करा आणि वाचा- कोल्हापूर जिल्ह्यात सध्या तरी चौघात मंत्रिपदासाठी मोठी चुरस होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर प्रकाश आवडे तातडीने भाजपमध्ये सहभागी झाले. यामुळे त्यांना मंत्रिपदाचे बक्षीस निश्चित मिळणार अशी चर्चा आहे. आवडे कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होऊ शकतात. याशिवाय विनय कोरे यांचे नाव चर्चेत आहे. कारण निवडणुकीनंतर त्यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. दोन वेळा ते मंत्री होते, त्यामुळे ते आपला हक्क या पदासाठी सांगू शकतात. क्लिक करा आणि वाचा- जिल्ह्यातून सेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आबिटकर हे एकमेव आमदार होते, पण त्यांना मंत्री न करता यड्रावकर यांना संधी देण्यात आली. यामुळे आबिटकर नाराज झाले. या नाराजीतून त्यांनी शिंदे गटाची सोबत जाणे पसंत केले. जे अडीच वर्षापूर्वी मिळाले नव्हते ते आता मिळेल या अपेक्षेत अबिटकर आहेत. शिवसेनेने मंत्रिपद दिल्यानंतरही शेवटच्या क्षणी यड्रावकर शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे यड्रावकर की अबिटकर असा मोठा प्रश्न शिंदे यांच्यासमोर उभा राहण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्रात जास्तीत जास्त चार किंवा पाच मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दावेदार मात्र दहापेक्षा अधिक आहेत. भाजप च्या वतीने आवाडे, शिवेंद्रराजे भोसले आणि सुरेश खाडे या तिघांना मंत्रिपद मिळण्याची चिन्हे अधिक आहेत, तर शिंदे गटाच्या कोट्यातून शहाजीबापू पाटील, यड्रावकर, शंभूराजे देसाई यांना मंत्रिपदाचे बक्षीस मिळेल अशी चर्चा आहे.