धावत्या लोकल ट्रेनला लटकणे पडले महागात; तरुणाचा हात सुटला आणि... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 24, 2022

धावत्या लोकल ट्रेनला लटकणे पडले महागात; तरुणाचा हात सुटला आणि...

https://ift.tt/XdeQPZt
ठाणे : लोकल ट्रेनच्या मोटार कोचच्या डब्याला लटकून प्रवास करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. तरुणाचा हात सटकला आणि तरुण खाली पडला आणि त्यात जखमी झाला आहे. ठाणे आणि कळवा रेल्वे स्थानका दरम्यान हा प्रकार घडला आहे. या तरुणाला त्याच्या नातेवाईकाने काही प्रवाश्यांच्या मदतीने ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज, कळवा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. सध्या या तरुणाच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली असून हाताला आणि पायाला प्लास्टर लावण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणे रेल्वे पोलीस करत आहेत. हा संपूर्ण थरारक प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (The youth was injured after falling from a train between Thane and Kalwa) लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे काही तरुण लोकलच्या मोटर कोचच्या डब्ब्याला लटकून मुंबईच्या दिशेने जात असताना हात सटकून तरुण खाली पडला आणि त्याच्या पायाला आणि हाताला जखमी झाला. हा व्हिडियो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या जखमी तरुणाचे नाव दानिश जकिर हुसैन खान असे असून हा तरुण कळव्याचा राहणार आहे. क्लिक करा आणि वाचा- हा दानिश खान १८ वर्षीय तरुण पीओपी सारखे मजुरीचे काम करत असून कळवा येथून दादर असा प्रवास करत होता. या दरम्यान त्याचा आत्तेभाऊ आणि आणखी काही नातेवाईक त्याच्यासोबत या डब्ब्याला लटकले असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. २३ जून रोजी सकाळी साडे ९ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. सध्या हा जखमी असून त्याच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहे. क्लिक करा आणि वाचा- सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्या हाताला आणि पायाला प्लास्टर लागले आहे. सदर झालेला अपघात हा स्वत:च्या निष्काळजी पणामुळे झाला असल्याचे जखमी इसमाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. सदर जखमी इसमची ठाणे रेल्वे पोलीस ठाणे येथे EPR नोंद असून पुढील अधिक तपास ठाणे रेल्वे पोलीस करीत आहेत. हा संपूर्ण थरारक प्रकार समोरून जात असलेल्या ट्रेनमधल्या काही व्यक्तींनी मोबाईल मध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. क्लिक करा आणि वाचा-