उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याला काँग्रेस राष्ट्रवादी जबाबदार, केसरकरांचा संजय राऊतांवर निशाणा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 30, 2022

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याला काँग्रेस राष्ट्रवादी जबाबदार, केसरकरांचा संजय राऊतांवर निशाणा

https://ift.tt/pdMo2wW
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. राजीनामा हा आमच्यासाठी आनंदाची गोष्ट नाही. राजीनामा ही दु:खाची गोष्ट आहे. आमच्या संघर्षाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोप दीपक केसरकर यांनी केला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा संजय राऊत अधिक जबाबदार आहेत. संजय राऊत यांनी रोज उठून केलेल्या वक्तव्यांमुळं महाराष्ट्र आणि केंद्र असा संघर्ष झाला. संघर्षामुळं महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम निर्माण झाला, असं दीपक केसरकर म्हणाले. आघाडीतील पक्ष आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जात होते, उमेदवार जाहीर करत होते, त्यांना निधी देऊन त्यांच्या विजयाच्या घोषणा करत आहेत. हे महाराष्ट्रात घडत होतं, आम्ही हे उद्धव ठाकरेंना सांगण्याचा प्रयत्न केला. आमदार आणि खासदार यांच्याबद्दल महाराष्ट्रात हे घडत होते. आम्ही जे सांगतो त्याऐवजी उद्धव ठाकरे शरद पवारांचं ऐकू लागले, असं दीपक केसरकर म्हणाले. पवार साहेब हे मोठे नेते आहेत ते आपला पक्ष वाढवतील त्यांचा पक्ष वाढवतील,असं दीपक केसरकर म्हणाले.