रेल्वे रुळांवर कोसळले झाड; भागलपूर एक्स्प्रेसच्या मोटारमनमुळे टळला मोठा अनर्थ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 28, 2022

रेल्वे रुळांवर कोसळले झाड; भागलपूर एक्स्प्रेसच्या मोटारमनमुळे टळला मोठा अनर्थ

https://ift.tt/yVSL4z8
ठाणे : ठाण्यातील परिसरात एका रेल्वे एक्स्प्रेस गाडीचा अपघात होण्याचा अनर्थ टळला. बिहारहून मुंबईच्या दिशेने मुंब्र्याजवळ रेल्वे रुळांवर एक झाड पडले होते. प्रसंगावधान राखत रेल्वे मोटारमनने वेळेत ब्रेक लावला आणि पुढचा अनर्थ टळला. जर रेल्वेचा एखादा डब्बा रुळांवरून घसरला असता, तर अनर्थ होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. तब्बल १ तासांच्या प्रयत्नानंतर ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाली. या घटनेत कुणालाही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. ( motorman avoids major accident) ठाण्यातील मुंब्र्याजवळ रेल्वेचा मोठा अपघात होता होता टळला आहे. बिहारहून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या भागलपुर एक्सप्रेसबाबत हा प्रकार घडला. २७ जूनच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने जात असताना एक भले मोठे झाड रेल्वे रुळांवर पडले होत. ही बाब मोटरमनच्या निदर्शनात आल्यानंतर मोटरमनने सावधानता दाखवत एक्स्प्रेसला ब्रेक लावला आणि पुढील अनर्थ टळला. क्लिक करा आणि वाचा- या एक्स्प्रेस गाडीला ब्रेक लावल्यानंतर गाडी थांबली. मात्र थांबता थांबता या गाडीचे दोन ते तीन डबे हे रुळांवर पडलेल्या झाडाच्या फांद्यांवरून पुढे गेले. मात्र परिस्थिती मोटरमनच्या नियंत्रणात होती. जर या फांद्यांमुळे रेल्वेचा एखादा डब्बा रुळावरून खाली उतरला असता तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. क्लिक करा आणि वाचा : एक्स्प्रेस गाडी थांबल्यानंतर मोटारचालकाने लागलीच ही बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर रेल्वे पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून रेल्वेच्या पटरीवर पडलेल्या या फांद्या हटवण्याचे काम केले. तब्बल १ तासांच्या प्रयत्नानंतर या रुळांवरून फांद्या आणि झाड हटवण्यात अग्निशमन दलाला यश आले. अखेर १ तास रखडल्यानंतर भागलपूर एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली. मात्र या घटनेमुळे काहीकाळ रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. क्लिक करा आणि वाचा-