'रोड टेस्टची वार्ता करू नका, बदल्यात हॉकी टेस्ट मिळेल'; नीलेश राणे यांचा इशारा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 28, 2022

'रोड टेस्टची वार्ता करू नका, बदल्यात हॉकी टेस्ट मिळेल'; नीलेश राणे यांचा इशारा

https://ift.tt/DMvFHdE
रत्नागिरी : राज्यातील राजकारणात यांच्या बंडामुळे मोठा भूकंप झाला आहे. गेले आठदिवस हा सत्ता संघर्ष सुरू असून राजकीय आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे गटाबरोबर गेलेल्या बंडखोर आमदारांना मुंबई येऊन पाहा, असा आव्हानात्मक इशारा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या सगळ्या घडामोडींवर भाजपचे प्रदेश सरचिटणीस रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार यांनी शिवसेना व सरकारवर गेल्या दोन दिवस बोचरी टीका करण्याची संधी सोडलेली नाही. 'रोड टेस्टची वार्ता करू नका, बदल्यात हॉकी टेस्ट मिळेल', असा थेट इशाराच नीलेश राणे यांनी शिवसेना व राष्ट्रवादीचे नाव न घेता ट्विट करून दिला आहे. (bjp leader criticizes mahavikas aghadi) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका करताना 'एकनाथजी शिंदें सोबत इतके आमदार निघून गेले आहेत की उद्धव ठाकरेंनी आता स्वतःच्या गटाचं नाव "शिवसेना" ऐवजी "शिल्लक सेना" करून घ्यावे, असा टोला नीलेश राणे यांनी ट्विटरद्वारे लगावला आहे. 'ज्यांनी शिवसेनेची वाट लावली तेच मेळावे घेत फिरत आहेत. आजारावर औषध उपाय असतो, आजारावर आजार उपाय नाही' अशीही तिरकस टीका नीलेश राणे यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा- 'हिम्मत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मत मागा. या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानाचाही नीलेश राणे यांनी समाचार घेतला आहे. 'हिम्मत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने उद्धव ठाकरे, हे आदित्य ठाकरेंना पण सांगा' असा एकेरी उल्लेख करत नीलेश राणे यांनी ट्विटर द्वारे केली आहे. क्लिक करा आणि वाचा - या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सत्ता संघर्षाच्या या वादात राजकीय टीका टिप्पणीना जोर आला असून आरोप प्रत्यारोप जोरदार रंगल्याचे चित्र आहे. क्लिक करा आणि वाचा -