शिंदेंचा राग काँग्रेस, राष्ट्रवादीवर नव्हे, तर...; पृथ्वीराज चव्हाणांनी वेगळंच कारण सांगितलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 30, 2022

शिंदेंचा राग काँग्रेस, राष्ट्रवादीवर नव्हे, तर...; पृथ्वीराज चव्हाणांनी वेगळंच कारण सांगितलं

https://ift.tt/tGKU0jn
मुंबई: मुंबई: गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याचा शेवट झाला आहे. यांच्या बंडखोरीमुळे सुरू झालेल्या सत्तानाट्याची अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानं झाली आहे. शिंदे गटानं ३९ आमदारांसह बंड पुकारल्यानं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं. त्याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाचा निर्णय विरोधात गेल्यानं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात राजीनामा द्यायला हवा होता. शेवटपर्यंत लढायला हवं होतं, अशा स्वरुपाची प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी दिली आहे. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्ध इतकी वर्षे लढलो, त्याच पक्षांसोबत काम कसं करायचं, लोकांना कसं सामोरं जायचं, असे प्रश्न शिंदेंनी विचारले. त्यावर चव्हाण यांनी भाष्य केलं. शिंदे यांचा राग काँग्रेस, राष्ट्रवादीवर नव्हता. शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आलं. मात्र आपल्याला ते मिळालं नाही. त्यामुळे ते नाराज होते, असं चव्हाण यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख असताना त्यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपद दिलं होतं. त्याचप्रमाणे पक्षाच्या वाट्याला आलेलं मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळेल, अशी आशा त्यांना होती. मात्र तसं काही होऊ शकलं नाही, असं चव्हाण यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र शरद पवारांनी वेगळी भूमिका घेतली. सत्ता स्थापनेवेळी मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांची नावं चर्चेच होती. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीत अनेक वरिष्ठ नेते असल्यानं पवारांनी ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यास सांगितलं. काँग्रेस, राष्ट्रवादीत अनेक वरिष्ठ नेते असल्यानं त्यांना ज्युनियर मुख्यमंत्र्यांसोबत काम करणं कठीण जाईल, अशी भूमिका पवारांनी घेतली. त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्री होता आलं नाही, असं चव्हाण यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाला संबोधित करून राजीनामा द्यायला हवा होता. अखेरपर्यंत लढायला हवं होतं, असं चव्हाण म्हणाले. पण आपली इतकी माणसं आपल्याला सोडून गेली, याचा धसका त्यांनी घेतला. त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत लढत दिली नाही. फेसबुक लाईव्हवरून राजीनामा देणं आणि विधिमंडळात राजीनामा देणं यात फरक असतो. विधिमंडळातलं भाषण रेकॉरवर राहतं, असं चव्हाण यांनी म्हटलं.