शिवसेना आमदाराला सूरतच्या हॉटेलमधून निघत असताना बेदम मारहाण, राऊतांचा खळबळजनक दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 22, 2022

शिवसेना आमदाराला सूरतच्या हॉटेलमधून निघत असताना बेदम मारहाण, राऊतांचा खळबळजनक दावा

https://ift.tt/6nCKUmk
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या तावडीतून उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका करुन घेतली. आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगाचं शिवसेना नेतृत्वासमोर आमदार कैलास पाटील यांनी कथन केलं. त्यांचं कथन ऐकून 'वर्षा'वरील सगळेच भावूक झाले. या प्रसंगाची मोठी चर्चा होत असतानाच शिवसेना खासदार () यांनी खळबळजनक दावा केलाय. शिवसेना आमदाराला सूरतच्या हॉटेलमधून निघत असताना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. अकोल्याच्या बाळापूरचे शिवसेना आमदार हे सुरत येथे भाजपाच्या तावडीत आहेत. मुंबईतून त्यांचे अपहरण केले गेले. सोमवारी रात्री त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गुजरात पोलिसांनी आणि गुंडांनी बेदम मारहाण केली. मुंबईतील गुंड देखील तेथे आहेत, असं सांगत गुजरातच्या भूमीवर हिंसा कशी?, असा सवाल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गुजरात सीएमओला टॅग करुन विचारला आहे. संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना थेट इशारा तत्पूर्वी जे शिवसेना आमदार आज इथे नाहीयेत, त्यांनी जर नियमांचं पालन केलं नाही, तर त्यांची आमदारकी रद्द होईल, त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागेल, त्यांची राजकीय कारकीर्द संपेल, असा इशाराच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांना सूरतला नेत बंड पुकारलं आहे. त्यानंतर शिंदेंसह सर्व आमदारांना परतण्याची ताकीद संजय राऊतांनी दिली. "आकडे कसले मोजताय? विधानसभेत वेळ येईल तेव्हा आकडे मोजा, पूर्ण बहुमत सिद्ध होईल. जे शिवसेना आमदार आज इथे नाहीयेत, त्यांनी जर नियमांचं पालन केलं नाही, तर त्यांची आमदारकी रद्द होईल, त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागेल, त्यांची राजकीय कारकीर्द संपेल" असा इशारा संजय राऊत यांनी दिला. "एकनाथ शिंदे आमचे सहकारी, मित्र सर्व काही आहेत. अजूनही आम्ही त्यांची वाट पाहतोय. आम्हाला खात्री आहे की एकनाथ शिंदे सगळ्या आमदारांसह परत येतील. आमदारांना तिथून परत यायचं आहे, त्यांना येऊ दिलं जात नाहीये. काही आमदार हॉस्पिटलमध्ये आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. असा दबाव जर कोणावर आणला जात असेल, तर हे या देशासाठी गंभीर आहे. अमित शाहांनी यात लक्ष घालावं. देशाचे न्यायप्रिय गृहमंत्री आहोत हे दाखवून द्यावं" असंही संजय राऊत म्हणाले.