धक्कादायक...अमेरिकेत मंकीपॉक्सचे दोन वेरियंट आढळले, रुग्णसंख्या २२ वर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 5, 2022

धक्कादायक...अमेरिकेत मंकीपॉक्सचे दोन वेरियंट आढळले, रुग्णसंख्या २२ वर

https://ift.tt/FUYKe7Z
वॉशिंग्टन : मंकीपॉक्सचे रुग्ण जगभरात आढळून येत आहेत. मंकीपॉक्सचा संसर्ग अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेतील मंकीपॉक्सची रुग्णसंख्या २२ वर पोहोचलीय. मंकीपॉक्स संदर्भात अमेरिकेत धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेत मंकीपॉक्सचे दोन वेरियंट आढळून आले आहेत. सीडीसीनं यासंदर्भातील माहितीला दुजोरा दिला आहे. सीडीसीनं अद्याप सर्व २२ जणांमध्ये आढळलेल्या संसर्गांचा अभ्यास केलेला नाही. अमेरिकेतील टेक्सासमधील एक व्यक्ती २०२१ मध्ये नायजेरियाच्या दौऱ्यावरुन जाऊन आला होता. त्याच्यामध्ये मंकीपॉक्ससदृश्य लक्षणं आढळली होती. त्याच प्रकारची लक्षण दोन जणांमध्ये आढळली आहेत. फ्लोरिडा मध्ये वास्तव्यास असलेली एक महिला आणि एका पुरुषाचा त्यात समावेश आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आफ्रिकेचा दौरा केला होता. इतर २० रुग्णांचे जेनेटिक अहवाल यूरोपमध्ये आढळलेल्या संक्रमणासारखे आहेत. उर्वरित २ नमुन्यांमध्ये २०२१ मध्ये नायजेरियाचा दौरा करणाऱ्या व्यक्तींना झालेल्या संसर्गाप्रमाणं लक्षण आहेत. सीडीसीचे तज्ञ जेनिफर मॅकक्विस्टन यांनी विषाणू एकसारखे वाटत असले तरी दोन्ही विषाणूंचं अनुवांशिक विश्लेषण भिन्न आहे. दोन्हींचा संबंध नाही, असं त्यांनी म्हटलंय. मॅकक्विस्टन यांच्या मते नव्या माहितीनुसार अमेरिकेत मंकीपॉक्स आढळण्याला दोन कारणं आहेत. त्यामुळं मंकीपॉक्सची सुरुवात नेमकी कुठून झाली हे सांगणं कठिण आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नायजेरियात विषाणू प्राण्यांकडून माणसांकडे आले आणि आता मनुष्याला संसर्गित करत आहेत, असं ते म्हणाले. नव्या माहितीच्या आधारे मंकीपॉक्सचा संसर्ग आफ्रिकेबाहेर कधीपासून पसरला असेल याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका रिपोर्टनुसार गेल्या या वर्षीच्या मे महिन्यापासून आतापर्यंत ९०० रुग्ण जगभरात आढळले आहेत. तर, २००३ मध्ये अमेरिकेत अशा प्रकारचे ४७ रुग्ण आढळले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार मंकीपॉक्स संसर्ग लोकांना नकळत पसरल्याची माहिती आहे. दरम्यान मंकीपॉक्सचे सर्वात जास्त रुग्ण ब्रिटनमध्ये पहिल्यांदा आढळले होते.