
नागपूर जिल्ह्यातील कोंडाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील एका निवासी आश्रम शाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोपावरून आश्रम शाळेच्या नाईट वॉचमनला कोंढाली पोलिसांनी अटक केली आहे. शिपाई राजेश मूलचंद मालापुरे याच्याविरुद्ध बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खडबड उडाली असून पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुसागोंदी येथील आश्रम शाळेत एका विद्यार्थ्यावर 17 ऑगस्टच्या रात्री लैंगिक शोषण करण्यात आले, तर दुसऱ्या एका विद्यार्थ्या सोबत गैर कृत्य करण्याचा प्रकार झाला असल्याची माहिती पुढे येत आहे.
पीडित विद्यार्थ्यांनी याप्रकरणी आश्रम शाळेच्या अधीक्षकाकडे तक्रार केली आहे. अधीक्षकांनी तातडीने कोंढाळी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.
(बातमी अपडेट होत आहे)