भारताच्या अग्नि-४ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, दुश्मनांना धडकी भरणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 7, 2022

भारताच्या अग्नि-४ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, दुश्मनांना धडकी भरणार

https://ift.tt/eUJTS0h
नवी दिल्ली : भारतानं सोमवारी दुपारी ओडिशामधील एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन मध्यम क्षमतेच्या बॅलेस्टिक मिसाइल अग्नि ४ च्या चाचणीमध्ये यश प्राप्त केलं आहे. अग्नि ४ ची क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्यानं भारताच्या सैन्य दलाची ताकद वाढली आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. अग्नि क्षेपणास्त्राचं परीक्षण सायंकाळी सात वाजता करण्यात आलं आहे. अग्नि ४ चं यशस्वी प्रक्षेपण भारतीय लष्कराच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरलं आहे. भारतीय सैन्य दल आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं चार वर्षानंतर मध्यम क्षमतेच्या अग्नि ४ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली आहे. यापूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये चाचणी करण्यात आली होती. अग्नि ४ क्षेपणास्त्र डीआरडीओ आणि भारत डायनेमिक्स लिमिटेडनं बनवलं आहे. याचं वजन १७ हजार किलोग्राम आहे तर लांबी ६६ फूट आहे. यामध्ये तीन प्रकारच्या शस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो. पारंपारिक, थर्मोबेरिक आणि स्ट्रॅटेजिक अणवस्त्राचा देखील यातून मारा केला जाऊ शकतो. अग्नि ४ क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५०० ते ४००० किलोमीटर आहे. तर ९०० किलोमीटर ऊंचीवर थेट मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. १०० मीटर पर्यंत हे क्षेपणास्त्र अचूक मारा करु शकतं. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार अग्नि-४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. आज सायंकाळी साडे सात वाजता ही यशस्वी चाचणी पार पडली. ओडिशामधील एपीजे अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी करण्यात आली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार अग्नि-४ चं यशस्वी प्रक्षेपण हे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील विश्वसनीय प्रतिकाराची क्षमता दर्शवणार ठरलं आहे. अग्नि ४ च्या चाचणीत यश मिळाल्यानं भारताच्या दुश्मन देशांची चिंता वाढणार आहे. अग्नि ४ मिसाईला अग्नि २ प्राइम म्हणून देखील ओळखलं जातं. अग्नि २ आणि अग्नि ३ या क्षेपणास्त्रांचं विकसित रुप म्हणून याकडे पाहिलं जातं.