रिषभ पंतकडून घडली पहिल्याच सामन्यात मोठी चूक, भारताला बसला जबरदस्त फटका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 10, 2022

रिषभ पंतकडून घडली पहिल्याच सामन्यात मोठी चूक, भारताला बसला जबरदस्त फटका

https://ift.tt/jEzC84y
नवी दिल्ली : पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. पण या सामन्यात भारताचा कर्णधार रिषभ पंतकडून एक मोठी चूक घडली आणि त्याचा सर्वात मोठा फटका यावेळी भारतीय संघाला बसल्याचे पाहायला मिळाले. या एका चुकीमुळे भारतीय संघाला विश्वविक्रमाची सुवर्णसंधी गमवावी लागली. रिषभ पंतकडून कोणती मोठी चूक पहिल्याच सामन्यात घडली, जाणून घ्या....भारताच्या फलंदजांनी यावेळी धडाकेबाज फटकेबाजी कत २१२ धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना भारत जिंकेल, असे वाटत होते. पण रिषभ पंतला यावेळी चांगले नेतृत्व करता आले नाही. कारण या सामन्यात मोक्याच्या क्षणी रिषभ पंतने चुकीचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच भारताला पराभवाचा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा चांगली गोलंदाजी करत होता. सामन्याच्या आठव्या षटकात अचूक गोलंदाजी करत चहलने फक्त सहा धावा दिल्या होत्या. त्यावेळी चहल हा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर चांगले दडपण आणत होते. पण त्यानंतर पंतने चहलला त्यावेळी गोलंदाजी करण्यारपासून थांबवले. चहलला जर त्यावेळी गोलंदाजी करण्याची संधी दिली असती तर दक्षिण आफ्रिकेवर दडपम वाढत गेले असते आणि त्याचा परीणाम सामन्यावर होऊ शकला असता. त्याचबरोबर अखेरच्या षटकांमध्ये फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर जास्त धावा जातात, हेदेखील सर्वांना माहिती आहे. तरीही जेव्हा संघाची दोन षटके शिल्लक होती तेव्हा चहलची दोन षटके बाकी होती. याचा अर्थ पंतने आठव्या षटकानंतर चहलच्या हाती थेट अखेरच्या षटकातच चेंडू दिला आणि त्याचे एक षटक वाया घालवले. त्याचबरोबर पंतने यावेळी चुकीच्या वेळी हार्दिक पंड्याला गोलंदजीला आणले, त्याच्या एका षटकात तीन षटकार बसले आणि त्यानंतर भारतावर दडपण वाढले. पंत हा चांगल्या फॉर्मात आहे, आयपीएलमध्येही त्याने अचूक आणि भेदक गोलंदाजी केली होती. पण तरीही त्याच्या गोलंदाजीचा योग्य वापर यावेळी पंतला करता आला नाही आणि त्यामुळेच भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला.