
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्ण संख्या वाढत आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ४१६५ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार ३०४७ जण करोनातून बरे बर झाले आहेत. महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी चार हजारांपेक्षा अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या २१७४९ वर पोहोचली आहे. तर, राजधानी मुंबईत २२५५ करोना रुग्णांची नोंद झालीय. मुंबईत दोन रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ११० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईसह देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये देखील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं समोर आलंय. सलग तिसऱ्या दिवशी करोना रुग्णांची संख्या ४ हजारांच्यावर महाराष्ट्रात १५ जूनपासून सलग तिसऱ्या दिवशी ४ हजारांपेक्षा अधिक करोना रुग्ण आढळून आलेले आहेत. राज्यात १५ जूनला ४०२४, १६ जूनला ४२५५ आणि आज ४१६५ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज ३०४७ जण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ७७ लाख ५८ हजार २३० जण करोनामुक्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासात ४१६५नव्या करोना रुग्णांची नोंद झालीय. मुंबईत सध्या १३३०४ सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात ४४४२ सक्रिय रुग्ण आहेत. नवी दिल्ली करोना अपडेट देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये करोना रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे. गेल्या २४ तासात नवी दिल्लीत १७९७ करोना रुग्ण वाढले आहेत. तर, नवी दिल्लीत एका रुग्णाचा करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीतील करोना संक्रमणाचा दर ८.१८ टक्केंवर पोहोचला आहे. गुरुवारी नवी दिल्लीत १३२३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली होती. नवी दिल्लीतील सक्रिय करोना रुग्णांची संख्या ४८४३ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि नवी दिल्लीशिवाय हरियाणा, कर्नाटक, केरळमध्ये देखील करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. देशातील सर्वाधिक करोना रुग्णसंख्या या राज्यांमध्ये आढळले आहेत. देशात सध्या सक्रिय करोना रुग्णांची संख्या ६३०६३ वर पोहोचली आहे.