पावसाचा धुमाकूळ! अकोल्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; कोळंबीमध्ये २ युवक थोडक्यात बचावले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 20, 2022

पावसाचा धुमाकूळ! अकोल्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; कोळंबीमध्ये २ युवक थोडक्यात बचावले

https://ift.tt/acv41fo
अकोला : अकोलासह जिल्ह्यात अनेक भागात आज रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला आहे. वीजेच्या जोरदार कडकडाटासह जवळपास तीन तास पाऊस सुरु होता. पावसामुळे ग्रामीण भागात प्रचंड नुकसान झाले आहे. तर अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू भागातील मजलापूर दापुरामध्ये शेतात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर दूसरीकड पातूर कोळंबीजवळ दोन युवक वाहून जाण्यापासून थोडक्यात बचावले असून त्यांची दुचाकी वाहून गेली. याशिवाय ग्रामीण भागामध्ये पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले. विज पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू १६ ते १९ जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत चांगला रिमझिम पाऊस झाला. यामुळे शेतकरी आनंदात होते. परंतु आज रविवारच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यांन, अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथे शेतकरी शेक इसामोद्दीन शेक इकरामोद्दीन (वय ५५) सायंकाळी शेतात काम करीत होते. यावेळीजोरदार पावसात व विजेच्या कडकडाटामध्ये अचानक त्याच्या अंगावर वीज पडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अकोला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपसाणीसाठी रवाना केला आहे. कोळंबीमध्ये दोन युवक थोडक्यात बचावले कोळंबी जवळील पातूरनंदापुर फाट्यावरील नाल्याच्या पाण्याचा पावसामूळ वेग वाढला. दरम्यान, हिरपूर येथील दोज जण दुचाकीसह खांबोऱ्याहुन गावी हिरपुरला जात असताना सुसाट वेगाने वाहत असलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. मुख्य म्हणजे उपस्थितांनी त्यांना नाला पार करण्यापासून थाबविले. मात्र, त्यांनी पूल पार करायला सुरुवात केली. यावेळी पाण्याच्या प्रचंड प्रवाहात युवक वाहून गेले. दरम्यान काहिच अंतरावर दोघांना बाहेर काढण्यात यश आले. पण यात त्यांची दुचाकी वाहून गेली. तेल्हारा, पातूरमध्ये मोठे नुकसान आज रविवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पातूर तालुक्यामध्ये फुलांच्या शेती उध्वस्त झाल्याची माहिती आहे. पातूरमध्ये मोठ्या प्रमाणात फुलशेती असल्याने पावसामुळे येथे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समजते. वीजेपासून अशी घ्या काळजी १) मेघगर्जनेसह विजा आणि पावसाच्या वातावरणाची - पूर्व कल्पना येताच शेतकरी शेतमजूरांनी त्वरीत शेताजवळील घराचा आसरा घ्यावा. २) पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक किंवा कोरडा पालापाचोळा घ्यावा, तसेच दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसावे. ३) ओलीताचे शेतशिवार किंवा तलावामध्ये काम करणाऱ्यांनी तत्काळ बाहेर यावे. जेणे करून सुरक्षित राहता येईल. अन् उंच झाडापासून लांब उभे राहावे. सोबतचं मोकळ्या जमिनीवरील खोलगट भागात गुडघ्यात वाकून बसावे.