पदार्पणवीर सुवेदचे द्विशतक; सर्फराजची दीडशतकी साथ, रणजी स्पर्धेत मुंबईचा ६४६ धावांचा डोंगर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 8, 2022

पदार्पणवीर सुवेदचे द्विशतक; सर्फराजची दीडशतकी साथ, रणजी स्पर्धेत मुंबईचा ६४६ धावांचा डोंगर

https://ift.tt/nFLHm0U
अलुरू (बेंगळुरू) : रणजी पदार्पणात द्विशतकी खेळी करणाऱ्या सुवेद पारकरला शतकवीर सर्फराज खानची दीडशतकी साथ लाभली, त्यामुळे मुंबईने उत्तराखंडविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मंगळवारी पहिला डाव ८ बाद ६४७ धावांवर घोषित केला. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर उत्तराखंडचे दोन फलंदाज ३९ धावांत बाद करून निर्णायक विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. सुवेदची ४४७ चेंडूंतील २५२ धावांची खेळी धावचीत झाल्याने संपुष्टात आली. त्यापूर्वी त्याने सर्फराजसह २६७ आणि शम्स मुलानीसह सहाव्या विकेटसाठी १०६ धावा जोडल्या. सुवेद बाद झाल्यावर मुंबईने लगेच आपला पहिला डाव घोषीत केला. तुषार देशपांडे आणि मोहित अवस्थी यांनी प्रत्येकी एक विकेट घेत उत्तराखंडची अवस्था २ बाद ३९ अशी केली. मूळ मुंबईकर असलेल्या जय बिस्ताला मुंबईने भोपळाही फोडू दिला नाही. सुवेद आणि सर्फराजने मुंबईचे पहिल्या दिवसाचे वर्चस्व अधिक भक्कम केले. या दोघांनी उत्तराखंडला ६४.१ षटके यशापासून रोखले. आदित्य तरे झटपट बाद झाला, पण सुवेदला त्यानंतर शम्स मुलानी, तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे यांनी चांगली साथ दिली. अजिंक्य रहाणे तंदुरुस्त नसल्याने चौथ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून सुवेदची निवड करण्यात आली होती. सुवेदने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. हा सामना झाल्यावर सुवेदने सांगितले की, " अमोल मुझुमदार सरांचा २६० धावांचा विक्रम आहे, याची जाणीव सोमवारी रात्री जेवण करताना करून दिली. अमोल सरांचा विक्रम मोडणे हेच लक्ष्य ठेवले होते. ते साध्य झाल्यावर डाव घोषीत करण्यात येणार हे मला माहिती होते, मीही तेच लक्ष्य ठेवून फलंदाजी करीत होतो." सातही शतके दीडशतकेसर्फराजने प्रथम श्रेणी सामन्यातील सातवे शतक दीडशतक केले. त्याने यापूर्वी या मोसमात ओडिशा (१६५) आणि सौराष्ट्रविरुद्ध (२७५) ही कामगिरी केली होती. त्याने यापूर्वी १७७ (वि. मध्य प्रदेश, २०२०), नाबाद २२६ (वि. हिमाचल प्रदेश, २०२०), नाबाद ३०१ (वि. उत्तर प्रदेश २०२०) आणि १५५ (मध्य प्रदेश २०१५) या शतकी खेळी केल्या आहेत. त्याची आता सरासरी ८०.४२ आहे. त्याची ही सरासरी किमान दोन हजार धावा केलेल्या जागतिक फलंदाजांच्या क्रमवारीत केवळ डॉन ब्रॅडमन (९५.१४) यांच्यापेक्षाच कमी आहे. या सामन्यानंतर सर्फराज खानने सांगितले की, " वडिलांनी चांगला सराव करून घेतला. सूर्यप्रकाशात स्विंग गोलंदाजीचा सामना अवघड असतो हे जाणून वडिलांनी सराव करून घेतला. प्रसंगी दिवसात तीनदा सराव केला. सामन्याच्यावेळी खूप झोप घेतो. त्यामुळे लक्ष केंद्रीत होत असावे. आता तंदुरुस्तकडेही लक्ष केंद्रीत केले आहे."