पहिल्याच सामन्यात बुमराने रचला मोठा विक्रम, एकाही गोलंदाजाला हा पराक्रम जमलाच नाही... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 13, 2022

पहिल्याच सामन्यात बुमराने रचला मोठा विक्रम, एकाही गोलंदाजाला हा पराक्रम जमलाच नाही...

https://ift.tt/Hg49U8q
ओव्हल : जसप्रीत बुमरा हा भारतासाठी पहिल्या सामन्याचा हिरो ठरला. कारण बुमराने पहिल्या षटकापासूनच विकेट मिळवायला सुरुवात केली आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण बुमराने यावेळी एक मोठा विक्रम रचला आहे. एकाही गोलंदाजाला आतापर्यंत असा पराक्रम आतापर्यंत करता आलेला नाही. वाचा- आजचा दिवस बुमराचाच होता. कारण पहिल्या षटकातच त्याने दोन बळी मिळवले. जेसन रॉय आणि जो रुट सारख्या दिग्गज खेळाडूंना त्याने भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर बुमराने जॉनी बेअरस्टोला सात धावांवर बाद केले आणि पुन्हा एकदा इंग्लंडच्या लायम लिव्हिंगस्टोनचा त्याने शून्यावर बाद केले. अखेरच्या स्पेलमध्येही बुमरा चांगलाच चमकला. बुमराने अखेरच्या स्पेलमध्ये इंग्लंडच्या दोन फलंदजांना माघारी धाडले आणि इंग्लंडचा डाव ११० धावांत आटोपण्यात सिंहाचा वाटा उचलला. पहिल्या षटकापासून ते अखेरच्या षटकामध्येही बुमराने विकेट मिळवल्या. पण त्याचबरोबर एक मोठा विक्रमही त्याने रचला आहे. कारण आतापर्यंत असा विक्रम एकाही भारताच्या गोलंदाजाला करताच आलेला नाही. वाचा- बुमराने या सामन्यात इंग्लंडच्या सहा फलंदाजांना बाद करत बळींचा षटकार साजरा केला. सहा विकेट्स मिळवताना बुमराने फक्त १९ धावा दिल्या. आतापर्यंत भारताच्या गोलंदाजाने इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच देशात केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. कारण आतापर्यंत क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात भारताच्या एकाही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्ध कोणत्याही मैदानात भारताच्या गोलंदाजाने साकारलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने इंग्लंडविरुद्ध खेळत असताना आपल्या १० षटकांमध्ये सहा विकेट्स पटकावण्याची किमया साकारली होती. पण त्यावेळी त्याला २५ धावा मोजाव्या लागल्या होत्या. हा सामना १२ जुलै याच दिवशी २०१८ साली नॉटिंगहमच्या मैदानात खेळवण्यात आला होता. त्यामुळे बुमराने यावेळी सहा विकेट्स तर मिळवल्या पण कुलदीपपेक्षा त्याने सहा धावा कमी दिल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर बुमराने या सहा विकेट्स फक्त ७.२ षटकांमध्ये मिळवल्या आहेत.