
म. टा. प्रतिनिधी, मुख्यमंत्री (CM ) यांच्या नेतृत्वाखाली असलेलीच (SHiv Sena) खरी आहे, त्यामुळे या सेनेचे पदाधिकारी करण्यासाठी कोल्हापुरात मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सुरू केलेल्या या प्रक्रियेला विरोध करताना उद्धव ठाकरेंच्या () शिवसेनेने जोरदार विरोध केला आहे. कार्यकर्त्यांनी याला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. (shinde group has started appointing new officials of in ) मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडखोरीत सहभागी होताना शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. आता विविध शहरातील नगरसेवक त्यामध्ये सहभागी होत आहेत. काही खासदारही त्याच वाटेवर आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी हळूहळू या बंडखोर शिंदेसेनेत सहभागी होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात माजी राज्यमंत्री राजेंद्र पाटील, आमदार प्रकाश आबिटकर आणि नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष क्षीरसागर यामध्ये सहभागी झाले. मात्र, शिवसेनेचा एकही पदाधिकारी त्यांच्यासोबत गेला नाही. क्लिक करा आणि वाचा- राज्यातील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सध्या जिल्हाप्रमुख विरोधात क्षीरसागर यांच्यातील वादाला तोंड फुटले आहे. एकमेकांवर गंभीर आरोप होत आहेत. या वादातूनच क्षीरसागर यांनी एक पाऊल पुढे टाकत जिल्ह्यात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. क्लिक करा आणि वाचा- आमचीच शिवसेना खरी असून यामध्ये जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, तालुका प्रमुख अशी पदे भरावयाची आहेत, इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन करतानाच त्यांनी मुलाखतीची प्रक्रियाही सुरू केली आहे. पण याला ठाकरे सेनेने विरोध केला आहे. आमचीच शिवसेना खरी आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी बंडखोर सेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले आहे. क्लिक करा आणि वाचा-