मुंबईकरांनो रविवारी लोकल प्रवास करताय?; वाचा ही महत्त्वाची बातमी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 16, 2022

मुंबईकरांनो रविवारी लोकल प्रवास करताय?; वाचा ही महत्त्वाची बातमी

https://ift.tt/7yhrN81
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः ठाणे ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी दरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान पश्चिम रेल्वेकडून ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. मध्य रेल्वे (मुख्य मार्ग) स्थानक - ठाणे ते कल्याण मार्ग - अप आणि डाऊन जलद वेळ - सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० परिणाम - ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावरून चालविण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्या १५ ते २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. हार्बर रेल्वे स्थानक - सीएसएमतटी ते चुनाभट्टी मार्ग - सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वेळ - अप आणि डाऊन परिणाम - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे स्थानक - चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्ग - अप आणि डाऊन धीमा वेळ - सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ परिणाम - ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.