उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरून लढणार आरपारची लढाई; महाराष्ट्र पिंजून काढणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 17, 2022

उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरून लढणार आरपारची लढाई; महाराष्ट्र पिंजून काढणार

https://ift.tt/aOAZPvb
मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर शिवेसना पक्षप्रमुख यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. आता ते लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आमदारांनी बंडखोरी केली असली तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार असून ठिकठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावे घेण्यात येणार आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आगामी महाराष्ट्र दौऱ्याचे त्यानुसार नियोजन करण्यात येणार असल्याचे कळते. एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्याच नावाचा वापर करायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत शिवसैनिकांमधील संभ्रम दूर करण्यसाठी तसेच पक्षाला बळकटी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची तयारी आणि आखणी सध्या शिवसेना भवनात सुरू आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हेदेखील असतील.