
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या बंडानंतर मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. इतकेच नाही, तर आता शिवसेना खरी कोणाची?, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार?, याचा फैसलाही निवडणूक आयोगापुढे होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक यांनी घेतलेली २६ आणि २७ जुलै रोजी प्रसिद्ध होत आहे. या मुलाखतीचा पहिला प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रोमोत उद्धव ठाकरे हे अतिशय शांत आणि संयमाने शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षावर आसूड ओढताना दिसत आहे. (the first promo of exclusive interview of shiv sena chief ) दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी यांची ही खास मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतात. राऊत यांच्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी अतिशय संयमाने उत्तरे दिलेली आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर टीकेचे आसूड ओढण्यात आल्याचे दिसत आहे. क्लिक करा आणि वाचा- त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत- उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या खास मुलाखतीत भाजपवर टीकेचे आसूड ओढताना दिसत आहेत. आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रोमोत उद्धव ठाकरे हे त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत असे म्हणताना दिसत आहेत. आज मुंबईत झालेल्या शिवसेना शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातही उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्देशून केलेल्या भाषणात हे वक्तव्य केलेले आहे. भाजपला शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळे करायचे आहे. मात्र जे शिवसेना आणि ठाकरेंना वेगळे करायला येतील त्यांना पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकणार नाही, असा विश्वास त्यांनी शिवसैनिकांना दिला आहे. क्लिक करा आणि वाचा- हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपवर उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. हे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत बसले आहेत, असे सांगतानाच नितीश कुमार हे हिंदुत्ववादी आहेत का?, असा सवाल उपस्थित करत भाजपचे हिंदुत्व बेगडी असल्याचे ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. क्लिक करा आणि वाचा- एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण या खास मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदाक टीकास्त्र सोडल्याचे दिसत आहे. तुम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायचे आहे? शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वत:ची तुलना करायला लागलात?, असे प्रश्नांचे बाण ठाकरे यांनी सोडले आहेत. तुमच्यात कर्तृत्व नाही आहे, तुमच्यात हिंमत नाही आहे. तुम्ही मर्द नाही आहात. तुम्ही विश्वासघातकी आहात, अशा शब्दांत ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे समर्थकांवर निशाणा साधला आहे.