डॉक्टर तरुणीची कोल्हापुरात आत्महत्या, स्वतःच इंजेक्शन घेत जीवन संपवलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 11, 2022

डॉक्टर तरुणीची कोल्हापुरात आत्महत्या, स्वतःच इंजेक्शन घेत जीवन संपवलं

https://ift.tt/81YdVCc
कोल्हापूर : येथील डॉ. अपूर्वा हेंद्रे () हिने स्वतः औषधांचा जादा डोस घेऊन आत्महत्या केली. अपूर्वा ही कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रवीण हेंद्रे यांची कन्या होती. काल रात्री अचानक घरातून बाहेर पडत अपूर्वा हेंद्रे बेपत्ता झाल्या होत्या. मध्यरात्री त्यांनी इंजेक्शनचा जादा डोस घेऊन आत्महत्या केल्याचे पहाटे उघडकीस आले. कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी भागात त्यांचा सकाळी मृतदेह आढळला. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिच्या शवविच्छेदनाचा व्हीसेरा राखून ठेवला आहे. आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही. पोलिसांकडून याप्रकरणी तपास करण्यात येत आहे. मध्यरात्रीचं घराबाहेर पडल्या अपूर्वा या गेले काही महिने अस्वस्थ होत्या. त्यांनी यापूर्वी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची समजते. काल रात्री उशिरा त्या घरात पोहोचल्या, त्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास त्या पुन्हा घराबाहेर पडल्या. बाहेरून कडी लावून त्या बाहेर पडल्यामुळे तिच्या वडिलांनी शोधाशोध सुरू केली. हाताला इंजेक्शन तसंच होतं... बराच वेळ शोधूनही त्या सापडल्या नाहीत. तेव्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली. शोधा शोध सुरू असतानाच पहाटे न्यू शाहूपुरी परिसरातील एका रिक्षा स्टॉप जवळ त्यांचा मृतदेह आढळला. त्यांनी हाताला इंजेक्शन घेतल्याचे स्पष्ट झाले. इंजेक्शन घेताच त्याखाली कोसळल्यामुळे हाताला इंजेक्शन तसेच राहिले होते. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीचं मृत्यू अपूर्वा हेंद्रे यांच्या पर्समध्ये औषध आणि इंजेक्शनही होते. त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टर अपूर्वा या सर्जन होत्या. त्या खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत होत्या. अपूर्वा हेंद्रे यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट कोल्हापूरमधील डॉ. अपूर्वा हेंद्रे यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळं आत्महत्या केली याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.