इंग्लंडवर दणदणीत विजयानंतरही रोहित शर्माला सतावत आहे एकच चिंता, पाहा नेमकं काय म्हणाला... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 20, 2022

इंग्लंडवर दणदणीत विजयानंतरही रोहित शर्माला सतावत आहे एकच चिंता, पाहा नेमकं काय म्हणाला...

https://ift.tt/W7xJPt9
मँचेस्टर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला आपल्या सहकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल ‘खूप’ काळजी वगैरे वाटत नाही; पण ‘आमच्या आघाडीच्या फळीच्या फॉर्मविषयी नक्की काही तरी करायला हवे’, असे सूचक विधान हा मुंबईकर फलंदाज आवर्जून करतो. वाचा- रोहित शर्मा यावेळी म्हणाला की, "सध्या जी काही थोडी पोकळी जाणवते आहे ती भरून काढण्यावर भर द्यायला हवा. प्रामाणिकपणे सांगायचे तर ओल्ड ट्रॅफर्डच्या (तिसऱ्या वनडेची खेळपट्टी) खेळपट्टीतून फार काही लाभत नव्हते. त्यातही आम्ही काही चुकीचे फटके खेळलो, ज्यामुळे विकेट गमावल्या. तसे असले तरी सध्या अपयशी ठरणाऱ्या खेळाडूंना मी पाठिंबा देणारच आहे. या खेळाडूंनी भारतासाठी याआधी भरीव योगदान दिले असून प्रतिकूल परिस्थितीतून वाटही काढली आहे. या व्यतिरिक्त मी माझ्या या सहकाऱ्यांविषयी फार काही बोलणार नाही, कारण सध्या अपयशी ठरणाऱ्या या सहकाऱ्यांमध्ये खूप मोठी गुणवत्ता आहे." वाचा- सलामीवीर शिखर धवन इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडेंमध्ये अनुक्रमे १, ९ आणि नाबाद ३१ धावा. अपयशाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या विराट कोहलीने एवढ्याच सामन्यांत मिळून ४६ धावा फटकावल्या आहेत. दोन टी-२० लढतींमध्ये विराट खेळला, त्यातील त्याची कामगिरी आहे ती ११ आणि १ धावा! रोहितने आघाडीच्या फलंदाजांमध्ये स्वतःचाही समावेश केला आहे. वनडे मालिकेतील नाबाद ७६ धावांच्या खेळीचा अपवाद वगळता रोहितला एका लढतीत भोपळाही फोडता आला नव्हता. तर एका सामन्यात त्याने अवघ्या १७ धावांचे योगदान दिले. वाचा- आघाडीच्या फलंदाजांना सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागत असतानाही भारताने वनडे मालिकेत इंग्लंडवर २-१ असा मालिकाविजय साजरा केला. गेल्या रविवारी पार पडलेल्या निर्णायक वनडेत हार्दिक पंड्या-ऋषभ पंतने पाचव्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी केल्यामुळे भारताने इंग्लंडवर पाच विकेटने मात करत मालिका जिंकली. हार्दिकने ७१ धावांचे योगदान दिले, तर पंतने नाबाद १२५ धावांची खेळी करत वनडेतील पहिले शतक साजरे केले. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने सामना जिंकला होता.