
रत्नागिरी : राज्यात सध्या () यांच्या शिवसेनेला () दररोज () गटाकडून नवनवे धक्के बसत आहेत. काही वर्षांपूर्वी () यांनी दिलेल्या मोठ्या धक्क्यानंतर कोकणातील नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केलेला 'जय महाराष्ट्र' हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातो. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश सचिव (Nilesh Rane) हे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काहीवेळापूर्वी नीलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत व विनायक राऊत यांच्यावर जोरदारपणे टीका करत उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. ( criticizes mp sanjay raut vinayak raut) 'हे दोन राऊत सोबत असे पर्यंत उद्धव ठाकरे खड्ड्यातच जाणार, दोन्ही राऊतांसाठी शिवसेना फक्त एक दुकान आहे', असे खळबळजनक ट्विट निलेश राणे यांनी करून जोरदार प्रहार केला आहे. तर, काल थेट उद्धव ठाकरे यांच्यावरही नीलेश राणे यांनी ट्विटरद्वारे जोरदार टीका केली होती. क्लिक करा आणि वाचा- उद्धव ठाकरे आता तरी ओळखा, तुम्ही सगळ्यांनाच नकोसे झाला आहात. फोटोग्राफी हा तुमचा छंद आहे तोच तुम्ही जोपासावा, राजकारण हे तुमचे काम नाही. वडिलांच्या जीवावर आयुष्य जगलात. पण त्यांनी केलेलं कार्य टिकवता आले नाही. म्हणून तुमची ही अवस्था, असे ट्विट त्यांनी काल केले होते. क्लिक करा आणि वाचा- त्यामुळे आता भविष्यात कोकणात उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध राणे हा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. कोकणातील निलेश राणे भाजपमधील पॉवरफुल युवानेते म्हणून ओळखले जातात. याचा प्रत्यय किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनुभवला आहे. त्यामुळे आता बदलत्या राजकिय समिकरणात कोकणात राणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रंगण्याची चिन्हे आहेत. क्लिक करा आणि वाचा-