'देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नातही विश्वास ठेवू नका'; अनिल गोटेंचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 3, 2022

'देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नातही विश्वास ठेवू नका'; अनिल गोटेंचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

https://ift.tt/F3n17zV
धुळे : एकीकडे येत्या १५ दिवसांत पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, स्वतंत्रपणे भाजपचे सरकार स्थापन करतील आणि बंडखोर सारे अपात्र होऊन घरी बसतील असा अंदाज काहीजण व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे यांच्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका, असे आवाहन माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष (Anil Gote) यांनी एखा खरमरीत पत्राद्वारे (CM Eknath Shinde) यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांना लिहिले आहे. ( has written a letter to criticizing devendra fadnavis) महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत घरोबा करून सरकार स्थापन केल्यानंतर 'राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका' अशा आशयाचे खरमरीत पत्र राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. क्लिक करा आणि वाचा- अनिल गोटे आपल्या पत्रात म्हणतात, 'आपली मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल यापूर्वीच आपले हृदयापासून अभिनंदन केले. मोगॅम्बो खुश हुआ. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे अनुभवलेत म्हणून वडीलकीचा सल्ला देतो. मानला तर फायदाच होईल. किमान फसवणूक व नंतर पश्चाताप होणार नाही, ही एक लाख टक्के खात्री देतो. देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका.' देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासारख्या धनगर समाजातील कार्यकर्त्याचा छळ केला. मनाचा इतका क्षुद्र की आपल्याकडून अनवधानाने का होईना पण अन्याय झाला, हे कबुल करण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्याकडे नाही. अशा राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीपासून सावध रहावे, असे सल्ला गोटे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे. क्लिक करा आणि वाचा- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपने महाविकास सरकारच्या बहुमत चाचणीसाठी मागणी केल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्वच नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज आहेत. क्लिक करा आणि वाचा- आज मात्र धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित फडणवीसांवर विश्वास ठेवू नका असा सल्ला दिला आहे. ह्या कर्मवीर पत्राची संपूर्ण धुळे जिल्ह्याचा राज्यात एकच चर्चा आहे.