
रत्नागिरी : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील एकनाथ शिंदे () गटाने बहुसंख्य आमदारांच्या जोरावर भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्ली नेतृत्वाचा आदेश मानून उपमुख्यमंत्री झाल्यावर या नाट्यमय घडामोडींना तूर्तास पूर्णविराम लागला आहे. यानंतर भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार (Nilesh Rane) यांनी माजी मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राष्ट्रवादीचे खासदार यांच्यावर देखील ट्विटच्या माध्यमातून सौम्य शब्दात टीका केली आहे. (bjp leader criticizes and ncp leader sharad pawar) नीलेश राणे ट्विटमध्ये म्हणतात, 'हे बघा उद्धव ठाकरे, आयुष्य इतकं पटकन बदलतं. तुम्हाला अजून कोणी नाही तर घमेंड आणि नियतीने हरवले, अती त्याची माती होतेच'. या ट्विटबरोबर त्यांनी 'सीएमओ महाराष्ट्र' एकनाथ शिंदे यांचे फोटोपेज शेअर केल आहे. क्लिक करा आणि वाचा- तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यावर शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले आहे. नीलेश राणे ट्विटमध्ये म्हणतात, 'पवारसाहेब म्हणाले फडणवीस साहेब एकमेव माजी मुख्यमंत्री जे उपमुख्यमंत्री झाले, अजित पवार चार वेळा माजी उपमुख्यमंत्री जे एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत.' क्लिक करा आणि वाचा- कोकणात ठाकरे सेना व शिंदे सेना वाद रंगण्याची चिन्हे कोकणातील शिवसेनेचे काही आमदार शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाबरोबर आहेत. तर गेले काही दिवस शिवसेनेत काहीसे बाजूला असलेले व महाविकास आघाडी सरकारवर टीका करणारे माजी खासदार अनंत गीते यांनी आपण उद्धव ठाकरे यांना साथ देत असल्याचे म्हटले आहे. रत्नागिरी, रायगडची चिंता करु नका, माझ्यावर सोडा असे सांगत त्यांनी पुढील लोकसभेचे शिवसेनेचे आपणच उमेदवार असे अप्रत्यक्षपणे सुचित केले आहे. गीते व राऊत यांच्या विधानावर महाडचे आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी टीकास्त्र सोडत संजय राऊत व अनंत गीते याना आव्हान दिले आहे. क्लिक करा आणि वाचा- तर भर पावसात भरत गोगावले यांच्या समर्थकांनी महाड येथे भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे कोकणात आता पुढील काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेना समर्थक यांच्यातील आरोप प्रत्यारोप कितपत टोकाला जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.