शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 21, 2022

शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त

https://ift.tt/4hZCsUa
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आले आहेत. एकीकडे महाराष्ट्रात रोजच नवनव्या राजकीय घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय नेमका का घेण्यात आला आहे, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांचं पत्र समोर आलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी एनसीपीचे अध्यक्ष यांच्या संमतीने राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि सेल बरखास्त केल्याची माहिती दिली आहे.