हिमाचलमध्ये पावसाचा कहर, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं चार मजली इमारत जमीनदोस्त, पाहा व्हिडिओ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 10, 2022

हिमाचलमध्ये पावसाचा कहर, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं चार मजली इमारत जमीनदोस्त, पाहा व्हिडिओ

https://ift.tt/O43aEvS
शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. शनिवारी दुपारी पाऊस बंद झालेला असताना शिमला मधील चौपालमध्ये चार मजली इमारत कोसळली. ही इमारत अवघ्या १० सेंकदात जमीनदोस्त झाली. या इमारतीमध्ये दो बँकांची कार्यालयं, एटीएम, बीअर बार, ढाबा आणि निवासी फ्लॅट होते. तळमजल्यावरील बीअर बारचा कर्मचारी चंदन शर्मा यांना इमारत कोसळणार असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी बाहेर पडून इतरांना सतर्क केलं. इमारतीमधील ढाबा मालक कृष्ण दत्त आणि विनोद पनाईक नावाच्या व्यक्तीनं जोर जोरात ओरडून इमारतीमध्ये असलेल्या व्यक्तींना बाहेर काढलं. इमारतीमधील सर्व व्यक्ती बाहेर पडल्यानंतर काही सेकंदामध्ये इमारत जमीनदोस्त झाली. आज महिन्यातील दुसरा शनिवार असल्यानं यूको बँक आणि हिमाचल ग्रामीण बँकेला सुट्टी असल्यानं ग्राहकांची गर्दी नव्हती. ढाबा आणि बीअर बारमध्ये कर्मचारी आणि ग्राहक मिळून १० ते १२ जण होते. एसडीएम चेत सिंह यांनी ज्यांचं नुकसान झालंय त्यांना तातडीनं मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इमारत कोणत्या कारणामुळं कोसळली याची चौकशी करण्यात येत आहे. चार मजली इमारत कोसळली यामध्ये जीवितहानी झालली नाही. बँकांमधील पैसे देखील सुरक्षित असल्याची माहिती आहे. अमरनाथमधील ढगफुटीमुळं १६ जणांचा मृत्यू अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळं एकूण १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर, अमरनाथमध्ये अडकलेल्या १५ हजार भाविकांना सुरक्षितपणे पंजतरणी येथील कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं आहे. अमरनाथ ढगफुटीनंतर आयटीबीपीकडून बचावकार्य करण्यात येत असल्याची माहिती आहे. भारतीय हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर्स श्रीनगरहून अमरनाथकडे रवाना झाली होती. अमरनाथमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळं १६ जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. ढगफुटीनंतर आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरफ, बीएसएफ, स्थानिक पोलिसांकडून बचावकार्य करण्यात आलं. आज बचावकार्याला वेग देण्यासाठी हवाई दलाची देखील मदत घेण्यात आली. हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर्स रवाना झाली होती.