रणवीरनं सिंहनं मुंबईत घेतला ४ मजली फ्लॅट; किंमत १०० कोटींच्या पार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 11, 2022

रणवीरनं सिंहनं मुंबईत घेतला ४ मजली फ्लॅट; किंमत १०० कोटींच्या पार

https://ift.tt/Ih35lTx
मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनं मुंबईत नवा फ्लॅट खरेदी केला आहे. वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रणवीरनं क्वाड्रूप्लेक्स फ्लॅट (चार मजली फ्लॅट) घेतला आहे. भवनानी आणि त्याचे वडील जुगजीत सुंदरसिंह भवनानी संचालक असलेल्या ओह फाईव्ह ओह मीडिया वर्क्स एलएलपीनं बँडस्टँड येथील सागर रेशम इमारतीमधील १६, १७, १८ आणि १९ व्या मजल्यावर प्रत्येकी एका अपार्टमेंटची खरेदी केली आहे. एनॉर्म नागपाल रिऍल्टी एलएलपीकडून रणवीर सिंह चारमजली फ्लॅट खरेदी केला आहे. एनॉर्म नागपाल रिऍल्टी एलएलपीमध्ये सागर देवन आणि अमित अमरलाल नागपाल यांची भागिदारी आहे. ८ जुलैला मालमत्तेची नोंदणी करण्यात आली. मालमत्ता करारानुसार चार मजली फ्लॅटची किंमत ११८.९४ कोटी रुपये इतके आहे. या व्यवहारासाठी रणवीरनं ७.१४ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरलं आहे. चार मजली फ्लॅटचा कार्पेट एरिया (चटई क्षेत्र) ११ हजार २६६ चौरस फूट इतकं आहे. फ्लॅटला १ हजार ३०० चौरस फुटांचं टेरेस आहे. मालमत्तेसोबत १९ कार पार्किंगची सोय आहे. या व्यवहाराबद्दल जुगजीत सुंदरसिंह भवनानी आणि सागर देवन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी सप्टेंबर २०२१ मध्ये अभिनेत्री आणि तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी अलिबागमध्ये सेकंड होम खरेदी केलं. त्याची किंमत २२ कोटी रुपये इतकी होती.