पावसाने केला कहर! जीव धोक्यात घालून रुग्णांना पुराच्या पाण्यातून उपचारासाठी नेले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 14, 2022

पावसाने केला कहर! जीव धोक्यात घालून रुग्णांना पुराच्या पाण्यातून उपचारासाठी नेले

https://ift.tt/pyawWEO
: मुसळधार पावसामुळे अकोल्यातील उरळ खुर्द येथील पुलावरून तीन-चार फूट पाणी वाहायला सुरुवात झाली असून त्यामुळे उरळ खुर्द आणि रतनपुरी या गावांचा संपर्क तुटला आहे. उद्भवलेल्या या स्थितीमुळे नागरिक जीव धोक्यात टाकून ये-जा करत असून या गावांमधील रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान, आज एका रुग्णाला जीव धोक्यात घालून गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यातून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. (Villagers carried through for treatment) दरम्यान, उरळ खुर्द आणि रतनपुरी या पुलाची उंची कमी आहे, सध्या नया अंदुरा धरणाची पातळी वाढली की या पुलावरून पाणी वाहते. परिणामी, चार ते पाच दिवस अनेक गावांचा संपर्क तुटतो. दरवर्षी ही समस्या निर्माण होत असल्याने पावसाळ्यात गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. क्लिक करा आणि वाचा- यंदाही ही समस्या उद्भवली आहे. या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणी वाढल्या आहे. तर येथील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा संकट आलंय. आसपासच्या गावातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे व रुग्णांचे अतोनात नाहक हाल होत आहेत. याबाबत प्रशासनाने गंभीर दाखल घेणे गरजेचे आहे. क्लिक करा आणि वाचा- रुग्ण, विद्यार्थ्यांचे होत आहेत हाल दरम्यांन, कारंजा धरण नव्यानेच बांधण्यात आले आहे. या धरणात पाणी अडवले जात आहे. त्याचे कुठलेही पूर्वनियोजन नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक व शेतीचे नुकसान होत आहे. तसेच झुरळ खुर्द ही दोन गावे संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेली आहेत. या गावातील नागरिकांसह, रुग्ण, शालेय विद्यार्थ्यांचे नाहक हाल होत आहेत. तर या प्रसंगी गावातील नागरिकांनी सहकार्य करून एका रुग्णाला आपत्ती निवारण पथकापर्यंत पोहोचवले आहे. भिकनराव बलदेव घ्यारे असे उपचारासाठी नेण्यात आलेल्या रुग्णाचे नाव आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, अशीच परिस्थिती राहिल्यास किंवा मोठा प्रमाणात पाऊस झाल्यास आणखी गंभीर परिस्थिती होऊ शकते, त्यामुळे प्रशासनाने हाय अलर्ट राहण्याची मागणी गावकरी करत आहेत.