सचिन तेंडुलकरबरोबर असलेला हा बॉलीवूडचा स्टार अभिनेता आहे तरी कोण, तुम्ही ओळखलं का... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 7, 2022

सचिन तेंडुलकरबरोबर असलेला हा बॉलीवूडचा स्टार अभिनेता आहे तरी कोण, तुम्ही ओळखलं का...

https://ift.tt/GBhRgCv
मुंबई : सध्या भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक ट्विट भन्नाट व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये सचिनने सध्या बॉलीवूडमध्ये स्टार असेलल्या एका अभिनेत्याचा फोटो पोस्ट केला आहे. हा बॉलीवूडचा सध्याचा स्टार आहे तरी कोण, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. सचिनने ट्विटमध्ये काय लिहिलं आहे, पाहा...सचिनने आज एक ट्विट केले आहे आणि हे ट्विट भन्नाट व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये सचिनने म्हटले आहे की, " माझ्याबरोबर या बॉलीवूड स्टारचा फोटो नेमका कधी काढला गेला आहे, कोणी सांगू शकेल का?" पहिल्यांदा हा फोटो पाहिल्यावर तो बराच जुना असल्याचे दिसत आहे. त्यावेळी सचिन भारतीय संघातून खेळत होता, असे जाणवत आहे. पण त्याच्याबरोबर असलेला हा बॉलीवूडचा स्टार कोण आहे, हे मात्र अद्याप बऱ्याच जणांना माहिती नसेल. सचिनने ट्विट केलेल्या फोटोमध्ये त्याच्याबरोबर आहे तो बॉलीवूडचा स्टार रणवीर सिंग आहे. रणवीर सिंगचा वाढदिवस असल्यामुळे सचिनने हा फोटो ट्विट केला आहे. भन्नाट अंदाजामुळे बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग नेहमीच चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याचा उत्साह हा सर्वांना त्याच्याकडं आकर्षित करत असतो. चित्रपट असो किंवा एखादा पुरस्कार सोहळला त्यात तो आपली छाप पाडतो. रणवीरचा बॉलिवूडमधला प्रवास थक्क करणारा आहे. बॉलिवूडची कोणतीही पार्श्वभूमी नसताना तो याक्षेत्रात आला असं म्हटलं जातं. परंतु खूपच कमी जणांना माहित आहे की, रणवीरची आजी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री होती. रणवीरची आजी 'चांद बर्क' एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. चित्रपट 'बूट पॉलिश'मध्ये राज कपूर यांनी त्यांना पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती. चांद यांचा देखील चाहतावर्ग मोठा होता. त्यांच्या डान्समुळं त्यांना खरी ओळख मिळाली होती.'डांसिंग लिली ऑफ पंजाब' असंही म्हटलं जायचं. अभ्यास, डान्स, अभिनय या सर्वच गोष्टीत त्यांना रस होता. वर्ष १९४६मध्ये पंजाबी सिनेसृष्टीत त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात केल्याचं म्हटलं जातं.