
: एका अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित करताना काढलेला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार जामनेर तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी त्या दोन नराधमांसह त्यांना मदत करणार्या इतर दोन अशा चौघांविरुद्ध मंगळवारी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (in jalgaon a minor girl was raped by two men) या संदर्भात पोलीसात दाखल तक्रारीनुसार, एका १७ वर्षांच्या मुलीला जळगाव तालुक्यातील तोरनाळा येथील आकाश सुरेश मुरळकर याने २ एप्रिल रोजी धमकावून बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. यावेळी त्याने शरीरसंबंधाचे व्हिडीओ चित्रीकरण देखील केले होते. यानंतर आकाशचा मित्र तुषार सोन्नी ( रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर ) याने १२ जून २०२२ रोजी बुलढाणा येथील एका कॅफेमध्ये पीडीत केला. यावेळी तुषारने देखील व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी पीडित मुलीला दिली. क्लिक करा आणि वाचा- यानंतर पीडीत मुलीला व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तिला ब्लॅकमेलींग करणे सुरू होते. शेवटी पीडीत तरुणीने पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी आकाश सुरेश मुरळकर ( रा. तोरनाळा ) आणि तुषार सोन्नी ( रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- तसेच या प्रकरणात या दोन आरोपींना आणखी दोघांनी मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यात एका तरुणीचाही समावेश आहे. तसेच जामनेर येथीलच योगेश लोणारी याच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- या चौघांविरुद्ध विरुद्ध बळजबरीने शरीरसंबंध ठेवणे, पोक्सो कायदा, तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ३ (१) (आर); ३ (१) (एस) अंतर्गत जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.