
मुंबई: अभिनेता ०६ जुलै रोजी ३७वा वाढदिवस () साजरा करत आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या लव्ह लाइफमधील एक रंजक बाब आपण जाणून घेणार आहोत. रणवीर आणि दीपिका पादुकोण (Ranveer Deepika Love Story) ही बॉलिवूडमधील अनेकांची आवडती जोडी आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गोलियों की रासलीला राम-लीला' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान २०१२ सालात हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सहा वर्ष हे कपल रिलेशनशिपमध्ये होते, २०१८ साली त्यांनी त्यांचं नातं पुढील पायरीवर नेत लग्नगाठ बांधली. पण तुम्हाला माहितेय का त्याआधी चार वर्षांपूर्वीच त्यांनी साखरपुडा केला होता. हे वाचा- दीपिका पादुकोणने एका मुलाखतीत याविषयी माहिती दिली होती. तिने तिच्या सिक्रेट एंगेजमेंटविषयी बोलताना असे म्हटले होते रिलेशनशिपमध्ये दोन वर्ष राहिल्यानंतर त्यांनी गुपचूप साखरपुडा केला होता. ही गोष्ट त्यावेळी त्यांनी लपवून ठेवली होती, केवळ त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती होती. २०१८ मध्ये फिल्मफेअरशी बोलताना अभिनेत्रीने अशी प्रतिक्रिया दिली होती की, 'जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा सहा महिन्यांतच मी आमच्यात भावनिकरित्या गुंतले होते. त्यानंतर असं होतं की आम्ही लग्न कधी करणार? मला त्याच्याबद्दल खात्री नाही असे कधी वाटलेच नाही'. यावेळी बोलताना अभिनेत्रीने त्यांच्या साखरपुड्याविषयी सांगितले होते. हे वाचा- यावेळी अभिनेत्री म्हणाली की, 'सहा वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही अनेक चढउतार पाहता पण आम्ही कधी ब्रेकअप नाही केला. आमच्यात कधी मोठं भांडण झालं नाही किंवा एखागी गोष्ट समजून घेण्यासाठी वेळ घ्यायला हवा असं कधी झालं नाही. आम्ही भांडलो, चढउतार पाहिले. पण यासर्वातही आम्ही एकत्र होतो. आम्ही चार वर्षांपूर्वी साखरपुडा केला. कुणाला याबाबत माहित नव्हते. केवळ माझे आणि त्याचे पालक आणि दोघांच्या बहिणींना याबाबत माहित होते.' दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. या कपलमधील केमिस्ट्री चाहत्यांना अजूनही आवडते. 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' तसंच '८३' हे चित्रपट एकत्र केले आहेत.