बिस्किट देतो असे आमिष दाखवत केला १३ वर्षीय मुलीचा विनयभंग; आरोपीला पाच वर्षाची शिक्षा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 28, 2022

बिस्किट देतो असे आमिष दाखवत केला १३ वर्षीय मुलीचा विनयभंग; आरोपीला पाच वर्षाची शिक्षा

https://ift.tt/SyjQT9z
: बिस्किट देतो असे आमिष देऊन अल्पवयीन मुलीचा करणाऱ्या एका ५४ वर्षीय आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १७ हजार रुपये दंड ठोठावला आहे. हा निकाल अकोला जिल्हा व सत्र न्यायाधीश (पहिले) शयना पाटील यांच्या न्यायालयाने आज बुधवारी दिला. ( for in ) समाधान उदेभान तायडे (वय ५४, रा. सांझापूर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने १३ ऑगस्ट २०१९ रोजी पीडितेला त्याच्या घरी बिस्किट देतो असे आमिष देऊन बोलावले होते. त्यानुसार पीडिता त्याच्या घरी गेली होती. त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, विनयभंग केला. तसेच कुणाला काही सांगितल्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुलीने ही बाब घरी सांगितल्यानंतर मुलीच्या आईने मुर्तिजापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपी समाधान उदेभान तायडे याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३४२,३५४ व ७,८,११,१२ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास तत्कालिन पोलिस अधिकारी स्वाती इथापे व संदीप मडावी यांनी केला व आरोपीविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. विशेष म्हणजे पीडिता ही वैद्यकीय कारणास्तव साक्ष देऊ शकली नाही. इतर साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी समाधान उदेभान तायडे याला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त सरकारी वकिल राजेश आकोटकर यांनी बाजू मांडली. तसेच पैरवी अधिकारी म्हणून एसएसआय काझी व हेड कॉन्स्टेबल नारायण शिंदे यांनी सहकार्य केले.