शेवटचा पेपर दिला, पोहायला गेले अन् बुडून दोघांचा मृत्यू, कुंटुंबीयांचा धरण परिसरात आक्रोश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 8, 2022

शेवटचा पेपर दिला, पोहायला गेले अन् बुडून दोघांचा मृत्यू, कुंटुंबीयांचा धरण परिसरात आक्रोश

https://ift.tt/CbLz6k1
नंदुरबार : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात पोहायला गेलेल्या २ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन विद्यार्थी नंदुरबार शहराजवळ असलेल्या विरचक धरणावर पोहायला गेले होते. पाण्यातील गाळाचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. राहुल सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे असं मृत्यू झालेल्या मुलांचे नाव आहेत. सध्या यशंवतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची परीक्षा सुरू होती. आज शेवटचा पेपर असल्याचे पेपर संपल्यानंतर जिजामाता महाविद्यालय येथील मुक्त विद्यापीठात शिकणारे ८ विद्यार्थी विरचक धरणात पोहण्यासाठी गेले होते. त्यात राहुल सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे यांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाण्यातील गाळाचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या धरणात पाणीसाठा कमी झाला असून मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळेच दोन विद्यार्थ्यांच्या गाळात पाय गेला आणि त्यांना गाळाचा अंदाज न आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. मुलं बुडाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. या विद्यार्थ्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं असून परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी घरातील सदस्य पोहोचल्यानंतर त्यांनी धरण परिसरातच आक्रोश केला.