
जळगाव : 'जे सोडून गेले ते कावळे आणि जे उद्धव ठाकरे () यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते शिवरायांचे खरे मावळे आहेत. हिम्मत असेल तर सद्यस्थितीत निवडणुका घ्या. बंडखोर आमदारांपैकी एक जरी आमदार निवडून आला तर राजकारण सोडेन. पाचोरा तालुक्यात नव्हे तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जरी निवडणूक लढविली तर त्यांचा पराभव करीन व शिवसैनिक विजयी होईल आणि असे झाले नाही तर बापाचे नाव लावणार नाही', असे थेट आव्हान संपर्कप्रमुख (Sanjay Sawant) यांनी दिले आहे. ( will also be defeated in pachora says ) ज्यांना प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांच्यातील फरक ओळखता येत नाही, ते आज हिंदुत्वाचे धडे देतायत. काकांची पुण्याई आणि शिवसेनेच्या विचारावर जे पुढे आले ते आता एकनाथ शिंदे यांना बाप म्हणताहेत, है दुर्दैव आहे, असा घणाघातही यावेळी संजय सावंत यांनी बंडखोर किशोर पाटील यांच्यावर केला. क्लिक करा आणि वाचा- पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे शिवसेनेच्या मेळावा पार पडला. त्यावेळी संजय यावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटात सहभागी झालेल्या बंडखोर आमदारांवर टीका केली. या मेळाव्यास जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, पाचोरा विधानसभा संपर्क प्रमुख सुनिल पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड अभय पाटील, माजी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, उद्धव मराठे, राजेंद्र साळुंखे, तालुका प्रमुख शरद पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, रमेश बाफना, विधानसभा क्षेत्र प्रमुख अविनाश कुडे, नगरसेवक दादाभाऊ चौधरी, उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा- बंडखोरांना अडीच वर्षांनंतरच कसे दिवंगत आनंद दिघे आठवले ? सन - १९ जुन १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेना पक्ष वाढविला. ज्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविलेल्या आमदारांवर मतदारांनी विश्वास ठेवला त्याच आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसले. यांच्या समर्थनार्थ समर्थकांनी रॅली काढली, रॅलीत येण्यासाठी नागरिकांना तीनशे रुपये द्यावे लागले. याउलट मोठा आक्रोश मोर्चा पार पडला. यात प्रत्येक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाला असेही सावंत म्हणाले. तसेच या बंडखोर आमदारांना आगामी काळात मतदार त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही, असेही सावंत यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा-