सपना चौधरीला अटक करून हजर करा; लखनऊच्या कोर्टाचे लोकप्रिय नर्तकीविरुद्ध अटक वॉरंट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 23, 2022

सपना चौधरीला अटक करून हजर करा; लखनऊच्या कोर्टाचे लोकप्रिय नर्तकीविरुद्ध अटक वॉरंट

https://ift.tt/bOtVciL
लखनऊ : लोकप्रिय (Sapna Chaudhary) हिच्या अडचणींत वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे लखनऊच्या कोर्टाने सपना चौधरी हिच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. सपना चौधरी हिला अटक करून कोर्टापुढे हजर करावे, असे स्पष्ट आदेश लखनऊच्या एसीजेएम कोर्टाने दिले आहेत. या पूर्वी सपनाच्या विरुद्ध १८ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. ( in lucknow ordered against dancer ) या प्रकरणावरील पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होत आहे. लखनऊमधील आशियाना पोलीस ठाण्यात १३ ऑक्टोबर २०१८ रोजी सपना चौधरीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. डान्स शोच्या नावाखाली सपना चौधरीने लाखो रुपये जमा केल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यानंतर ती कार्यक्रमाला आली नाही आणि शो रद्द झाला. आयोजकांनी सपनावर पैसे चोरल्याचा आरोप केला होता. क्लिक करा आणि वाचा- हे संपूर्ण प्रकरण तीन वर्षांपूर्वीचे आहे. या प्रकरणाबात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, १३ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ३ ते १० या वेळेत स्मृती उपवनमध्ये सपना चौधरीच्या डान्स शोसह इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रति व्यक्ती ३०० रुपये या दराने ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकिटे विकण्यात आलेली होती. क्लिक करा आणि वाचा- सपना आणि इतर आरोपींवर आरोप निश्चिती होणार हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो लोक तिकीट घेऊन कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र सपना चौधरी रात्री १० वाजता आली. यावर प्रेक्षकांनी एकच गोंधळ घातला. त्यानंतर तिकीटधारकांचे पैसेही परत करण्यात आले नाहीत. ४ सप्टेंबर २०२१ रोजी न्यायालयाने या प्रकरणी सपना चौधरीचा अर्ज फेटाळला होता. आता या खटल्यात सपना आणि इतर आरोपींवर आरोप निश्तिती करण्यात येणार आहे. क्लिक करा आणि वाचा-