काँग्रेसचा हा आमदार भाजपमध्ये जाणार? जोरदार चर्चा; समोर येत आमदारानेच जाहीर केले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 25, 2022

काँग्रेसचा हा आमदार भाजपमध्ये जाणार? जोरदार चर्चा; समोर येत आमदारानेच जाहीर केले

https://ift.tt/WSdx7C0
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा संपूर्ण राज्यात थंडावत नाही तोच आता नवी चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे कट्टर पदाधिकारी आमदार शिरीष चौधरी ( ) हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा करण्यात येत आहे. राज्यात भाजपचे नेत्यांकडून ठिकठिकाणी भाषणांमधून काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले जात आहे. या वक्तव्यावर अकोला येथील कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( ) यांनी भाजपचे काही नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. आता काँग्रेसला धक्का ( ) देण्याची तयारी भाजपने केल्याचं बोललं जात आहे. जळगाव जिल्ह्यातीलही रावेर येथील काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेवर आमदार शिरीष चौधरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मला अनेक कार्यकर्ते, भाजपतील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत. मात्र मी भाजपमध्ये जाणार अशी कुठलीही परिस्थिती सध्या नाही. अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या विचारांवर निष्ठा ठेवून आम्ही काम करतो आहे, असं स्पष्टीकरण आमदार शिरीष चौधरी यांनी दिलं आहे. ही एक अफवा आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तसेच हितचिंतकांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, यामुळे ही अफवा पसरवली जात आहे. मात्र पक्ष विषयी प्रतारणा करण्याचं कुठलही कारण नाही. कारण असतं तर दुसरी गोष्ट असती. अशी काही भूमिका घेतली तर मी त्याबाबत स्पष्ट सांगेल. कारण यापूर्वी नेहमी माझी भूमिका ही स्पष्टपणे सांगितली आहे. त्यामुळे आताही तसं काही असेल तर सर्वांसमोर जाहीर करेन. अशा चर्चांनी मी अस्थिर होणारा पदाधिकारी नाहीये, असं म्हणत अफवा पसरवणाऱ्यांना आमदार शिरीष चौधरी यांनी सुनावलं आहे.