पवारांना सोडलं, पिचडांना सलग तिसऱ्यांदा धक्का, विधानसभा,ग्रामपंचायतीनंतर साखर कारखान्यात पराभव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 27, 2022

पवारांना सोडलं, पिचडांना सलग तिसऱ्यांदा धक्का, विधानसभा,ग्रामपंचायतीनंतर साखर कारखान्यात पराभव

https://ift.tt/TBo6vcX
मुंबई : एकेकाळी राष्ट्रवादीत शरद पवारांशी एकनिष्ठ आणि मर्जीतले असलेले नेते अशी मधुकर पिचड यांची ओळख होती. पण २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या पिचड पिता-पूत्रांना एकामागोमाग एक धक्के बसलेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही पिचड समर्थकांच्या पदरी निराशा आली. ता थेट २८ वर्षांपासून सत्तेत असलेल्या अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीतही पिचड गटाचा मोठा पराभव झालाय. पिचड पिता पुत्रांच्या २८ वर्षांच्या निर्विवाद सत्तेला विरोधाकांनी सुरूंग लावत कसा धुव्वा उडवण्यात यश मिळवलंय. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव माजी आमदार यांना दणक्यावर दणके बसत आहेत. विधानसभेतील पराभवानंतर अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही पिचड समर्थकांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व अधिक राहिले. आता प्रतिष्ठेच्या अगस्ती सहकारी साखर कारखान्यातील सत्ताही पिचड पिता-पुत्रांच्या हातून गेली आहे. शेतकरी समृद्धी मंडळ आणि शेतकरी विकास मंडळात ही निवडणूक झाली. अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील उमेदवारांना मिळालेली मते: अशोकराव भांगरे : ४ हजार २१४ मते (विजयी) मधुकरराव पिचड : २ हजार ८५० मते (पराभूत) २१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत पिचड विरोधी असलेल्या शेतकरी समृद्धी मंडळाने आघाडी घेतली आणि सर्वच जागांवर दणदणीत विजय मिळवत कारखान्यावर झेंडा फडकावलाय. ग्रामपंचायत नंतर साखर कारखान्याचीही सत्ता गमावल्याने मधुकरराव पिचड यांना मोठा धक्का बसला आहे. या पराभवामुळे पिचड यांच्या राजकीय वर्चस्वालाही चांगलाच धक्का बसलायं, अशा चर्चा सुरु आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका मधुकरराव पिचड यांचा बालेकिल्ला होता.राष्ट्रवादीत असताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष, तसेच आदिवासी विकास मंत्रिपदही भूषवलं. मात्र, २०१९ ला पिचड यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ ला मुलगा वैभव पिचड याचा विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते डॉ. यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजूर ग्रामपंचायतीत पराभव झाला आहे. २८ वर्षांपासून अगस्ती सहकारी साखर कारखान्यात कारखान्याचे संस्थापक अध्यक्षपदी असणाऱ्या पिचड यांच्या अगस्ती साखर कारखान्यावर विरोधकांचा झेंडा लागला आहे.