
: रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे शस्त्रास्त्रे भरलेल्या सापडली होती त्यानंतर आता पुन्हा उरण तालुक्यात संशयित बोट सापल्याने खळबळ उडाली आहे. करंजा बंदरातून आज संशयित बोट ताब्यात घेण्यात आली आहे. उरण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. उरण ते रेवस या अरबी समुद्रातील दोन बंदराच्या परिसरात उरणचे मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी गस्त घालत होते. यावेळी हा प्रकार समोर आला आहे. त्यांना विना क्रमांकाची बोट आढळून आली. या संशयित बोटीचा रेवस बंदरातील सुरक्षारक्षकांनी पाठलाग करून ती ताब्यात घेतली आहे. (A suspicious boat was found in the sea of in Raigad district) उरणच्या मत्स्यव्यवसाय विभागाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर संशयित बोट उरणच्या करंजा बंदरात नांगरण्यात आली आहे. या बोटीचा उरण पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनास्थळाला उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी भेट दिली. क्लिक करा आणि वाचा- बोटीत डिझेल आढळून आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सोमवारी बंदरात गस्ती घालीत असताना विना क्रमांकाची बोट आढळून आली असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती उरणचे मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी सुरेश बहुलगावे यांनी दिली. क्लिक करा आणि वाचा- १८ ऑगस्ट रोजी हरिहरेश्वलाही सापडली होती बोट रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरमध्ये समुद्र किनाऱ्यावर गेल्या महिन्यात १८ ऑगस्ट रोजी एक बोट संशयास्पद स्थितीत आढळून आली होती. या बोटीत शस्त्रास्त्रे सापडली होती. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. ही बोट पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं किनाऱ्यावर आणली. या बोटीत एके-४७ रायफल आणि शस्त्रास्त्रं आढळून आल्याची माहिती मिळली होती. क्लिक करा आणि वाचा-