अभ्यासाचा कंटाळा आला, रागाच्या भरात १४ वर्षीय विद्यार्थ्याने उचलले हे पाऊल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 22, 2022

अभ्यासाचा कंटाळा आला, रागाच्या भरात १४ वर्षीय विद्यार्थ्याने उचलले हे पाऊल

https://ift.tt/5mX9jdn
: अभ्यासाचा कंटाळा आल्यामुळे एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने रागाच्या भरात आश्रम शाळेतून पळ काढल्याची घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील दिग्रस येथे घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य अविनाश काळे यांनी मुलाने शाळेतून पळ कडल्याचे पोलिसांना सांगितल्यामुळे या मुलाला परभणी बस स्थानकामधून ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य काळे यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे. तर पोलिसांनी काही क्षणातच मुलाचा शोध लावल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. (The because he was bored with his studies) जिंतूर तालुक्यातील दिग्रस येथील शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या १४ वर्षीय विद्यार्थ्याने अभ्यासाचा कंटाळा येत असल्याने रागाच्या भरामध्ये आश्रम शाळेमधून पळ काढला. या घटनेची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य अविनाश काळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी जिंतूर पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. क्लिक करा आणि वाचा- पोलीस अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेऊन परभणी सायबर क्राईम येथील कर्मचारी बालाजी रेड्डी व गणेश कौटकर तसेच गावातील सहकारी यांचे मदतीने परभणी बसस्थानकाजवळ या मुलास ताब्यात घेऊन जिंतूर पोलिस ठाणे येथे आणत त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने माझे अपहरण झाले नसून मी रागारागाने निघून जात असतांना परभणी येथे मला पकडल्याचे सांगितले. त्यावर जिंतूर पोलिसांनी वडील व मुलाचे योग्य समुपदेशन करून घरी पाठवले. क्लिक करा आणि वाचा- या सतर्क कारवाईमुळे पोलिस दलाचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. दरम्यान मागील काही दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय झाली असल्याचे अफवा पसरली असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. क्लिक करा आणि वाचा-