सूर्यकुमार यादवला एकाच दिवसात मिळाल्या तीन गूड न्यूज, असं नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 29, 2022

सूर्यकुमार यादवला एकाच दिवसात मिळाल्या तीन गूड न्यूज, असं नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...

https://ift.tt/EU2LOr4
थिरुवनंतरपुरम : आजचा दिवस सूर्यकुमार यादवसाठी खास ठरला. कारण आजच्या एकाच दिवशी सूर्यकुमार यादवला एक नाही तर तब्बल तीन गूड न्यूज मिळाल्याचे पाहायला मिळाले. पहिली गूड न्यूज...सूर्यकुमारने आजच्या सामन्यात दमदार अर्धशतक साकारले. पण आजच्या सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदजी करत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आतापर्यंत एका वर्षाच सर्वाधिक धावा करणारा तो भारताला पहिरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम शिखर धवनच्या नावावर होता. शिखर धवनने २०१८ साली ६८९ धावा केल्या होत्या. पण सूर्याने आजच्या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावले, त्यामुळे सूर्याच्या या वर्षात ७३२ धावा झाल्या आहेत. दुसरी गूड न्यूज...सूर्याने आजच्या सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी करत असताना पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे. या सामन्यापूर्वी मोहम्मद रिझवानच्या नावावर सर्वाधिक षटकारांचा विक्रम होता. रिझवानच्या नावावर ४२ षटकार होते. पण सूर्याने आजच्या सामन्यात तीन षटकार लगावले आणि त्याचे आता या वर्षात ४५ षटकार झाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकारांचा विक्रम सूर्याच्या नावावर आहे. तिसरी गूड न्यूज....ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात ३६ चेंडूत मॅच-विनिंग ६९ धावा केल्यामुळे सूर्यकुमारच्या नावावर ८०१ रेटिंग गुण झाले आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा दोन रेटिंग गुणांनी पराभव करत त्याने दुसरे स्थान पटकावले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपले स्थान कायम ठेवले आहे; तर माजी कर्णधार विराट कोहलीने क्रमवारीत सुधारणा केली आहे. रोहित १३व्या तर कोहली १५व्या स्थानावर पोहोचला आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेतील तीन डावात अनुक्रमे ११, ४६ आणि १७ धावा केल्या. कोहलीने या सामन्यांमध्ये २, ११ आणि ६३ धावांची खेळी खेळली. या मालिकेत ५५, १० आणि १ धावा काढणारा भारतीय उपकर्णधार लोकेश राहुलची क्रमवारीत चार स्थानांची घसरण झाली असून तो २२व्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत ८६१ रेटिंग गुणांसह आपले अव्वल स्थान मजबूत केले आहे.