ग्राहकांनाही ड्रेस-कोड; हाफ-पॅंट घालून येणाऱ्या पुरुषांना बँकेत नो-एन्ट्री, काय आहे नवा नियम जाणून घ्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 2, 2022

ग्राहकांनाही ड्रेस-कोड; हाफ-पॅंट घालून येणाऱ्या पुरुषांना बँकेत नो-एन्ट्री, काय आहे नवा नियम जाणून घ्या

https://ift.tt/eKtHQMi
: बँक कर्मचाऱ्यांप्रमाणेच ग्राहकांना देखील ड्रेस-कोड असतो का? असे अद्याप नसले तरी आता कॅनरा बँकेच्या एका शाखेत असे होताना दिसत आहे. बागपत जिल्ह्यातील शाखेच्या व्यवस्थापकाने "बँकेच्या महिला कर्मचार्‍यांचे लक्ष विचलित होते" सांगून पुरुष ग्राहकांना हाफ पँट घालून आवारात प्रवेश करण्यास "बंदी" ची नोटीस लावली आहे. ही बँक बागपतच्या किशनपूर बहल गावात राष्ट्रीय महामार्गालगत आहे जिथे अनेक स्थानिक रहिवासी आणि जवळपास स्थायिक झालेल्यांची या शाखेत खाती आहेत. शुक्रवारी हाफ पँट घालून बँकेत पोहोचलेल्या अनेक ग्राहकांना सुरक्षा रक्षकाने परत पाठवल्याचे देखील प्रकरण समोर आले. काय आहे प्रकरण कॅनरा बँकेची शाखा दिल्ली-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील किशनपूर बराल गावात आहे. या गावाबरोबरच आजूबाजूच्या अनेक गावांतील ग्राहकही येथे येतात. अनेक तरुण ग्राहक हाफ पँट घालून शाखेत येतात, ज्याला महिला कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. अशा ग्राहकांशी त्यांनी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. शुक्रवारी या संदर्भात बँकेच्या व्यवस्थापकाने शाखेच्या मुख्य गेटवर नोटीसही चिकटवली, त्यानंतर हाफ पँट परिधान केलेल्या ग्राहकांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अनेक महिलांचा समावेश असलेल्या काही शाखा कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रारी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बँक व्यवस्थापकाने निदर्शनास आणून दिले. सुरक्षा रक्षकासाठी सूचना जाहीर बँकेच्या व्यवस्थापकाच्या वतीने येथे तैनात असलेल्या गार्डला हाफ पँट घालून येणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला शाखेत येऊ देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत हाफ पँट घालून आलेल्या अनेक ग्राहकांना परतावे लागले. याप्रकरणी प्रभारी शाखा व्यवस्थापक अर्चना यांनी सांगितले की, बँकेच्या शाखेत महिला व पुरुष ग्राहक येतात. ग्राहकांना सुसंस्कृत वेशभूषा करून यावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ग्राहकांनी काय करावे? दरम्यान, व्यवस्थापकाच्या या निर्णयाविरोधात ग्राहक काय पाऊल उचलू शकतात, याचीही चर्चा आता सुरू आहे. त्यामुळे अशा आदेशामुळे जर ग्राहकाला त्रास होत असेल, तर ग्राहक शाखा व्यवस्थापकाविरुद्ध बँकेच्या झोनल ऑफिसरकडे लेखी तक्रार करू शकतात. झोनल अधिकाऱ्यांनी शाखा व्यवस्थापकावर कारवाई न केल्यास ग्राहक थेट ग्राहक न्यायालयात तक्रार करू शकतात. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम-३५ अंतर्गत शाखा व्यवस्थापकाविरुद्धही तक्रार करता येते.