भारताशी सुपर-४मध्ये कोण खेळणार पाहा समीकरण, पाकिस्तानपेक्षा हाँगकाँगचे पारडे जड... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 2, 2022

भारताशी सुपर-४मध्ये कोण खेळणार पाहा समीकरण, पाकिस्तानपेक्षा हाँगकाँगचे पारडे जड...

https://ift.tt/z2c1rEl
दुबई : आशिया चषक स्पर्धेतील रंजकता आता वाढत चालली आहे. भारतीय संघ सुपर-४मध्ये पोहोचला आहे. पण भारताशी या फेरीत कोणता संघ खेळणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. भारताविरुद्ध खेळताना हाँगकाँगने पाकिस्तानपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताबरोबर आता कोणता संघ खेळू शकणार, याचे समीकरण आता स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान आणि हाँगकाँग या दोन्ही संघांचा विचार केला तर त्यांना पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. भारताने दोन्ही संघांना पराभूत केले आहे. भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानच्या संघाने १४७ धावा केल्या होत्या, तर हाँगकाँगच्या संघाने १५२. या दोन्ही संघांचे सामने अखेरच्या षटकापर्यंत गेले होते. त्यामुळे फक्त हा विचार केला तर हाँगकाँगचे पारडे जड आहे. पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यामध्ये शुक्रवारी सामना होणार आहे. या सामन्यानंतर ही गोष्ट स्पष्ट होऊ शकते. पण हा सामना जर होऊ शकला नाही तर आशिया चषकातील गुणतालिका नेमकं काय सांगते, हे पाहावे लागले. आशिया चषकातील अ गटामध्ये भारत दोन विजयांसह अव्वल स्थानावर आहे. या गुणतालिकेत पाकिस्तान आणि हाँगकाँग यांना आतापर्यंत एकही गुण पटकावता आलेला नाही. पण गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ हा दुसऱ्या स्थानावर आहे. कारण पाकिस्तानचा रन रेट हा ०.१७५ असा आहे, तर हाँगकाँगचा रन रेट हा -२.००० असा आहे. हाँगकाँगने जास्त धावा केल्या असल्या तरी भारताने त्यांच्याविरुद्ध खेळताना सर्वाधिक धावा केल्या होत्या. भारताने हाँगकाँगविरुद्ध खेळताना १९२ धावा केल्या होत्या, तर पाकिस्तानविरुद्ध त्यांनी १४८ धावा केल्या. त्यामुळे जास्त धावा दिल्यामुळे हाँगकाँगच्या संघाचा रनरेट हा सर्वात कमी आहे आणि याचाच फटका त्यांना बसू शकतो. त्यामुळे जर हा सामना जर काही कारणांमुळे होऊ शकला नाही तर त्याचा फटका हाँगकाँगला बसू शकतो आणि पाकिस्तानचा संघ थेट सुपर-४ फेरीमध्ये पोहोचू शकतो. त्यामुळे सामना झाला नाही तर रनरेट या एका गोष्टीवरच निर्णय घेतला जाणार आहे.